मेंढेगाव येथे तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:08 IST2021-06-04T04:08:24+5:302021-06-04T04:08:24+5:30

कुही : दारूच्या नशेत शेतातील एका कडुनिंबाच्या झाडाला गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील ...

Youth commits suicide at Mendhegaon | मेंढेगाव येथे तरुणाची आत्महत्या

मेंढेगाव येथे तरुणाची आत्महत्या

कुही : दारूच्या नशेत शेतातील एका कडुनिंबाच्या झाडाला गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मेंढेगाव येथे बुधवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली.

माेहन शालिक ठाकरे (२९, रा. मेंढेगाव, ता. कुही) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याला माेठ्या प्रमाणावर दारूचे व्यसन हाेते. घटनेच्या चार-पाच दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांनी बियाणे खरेदीसाठी सात हजार रुपये दिले हाेते; परंतु माेहनने सर्व पैसे दारूवर खर्च केले. पेरणीचा हंगाम ताेंडावर असताना अजूनही बियाणे खरेदी न केल्याने ताे तणावात हाेता. अशातच कुटुंबीयांच्या भीतीपाेटी त्याने गावालगत असलेल्या चंद्रकांत ठाकरे यांच्या शेतातील एका कडुनिंबाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच कुही पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुही येथे पाठविला. याप्रकरणी मृताचा भाऊ अरविंद ठाकरे यांच्या तक्रारीवरून कुही पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सहायक पाेलीस निरीक्षक कमलेश साेनटक्के करीत आहेत.

Web Title: Youth commits suicide at Mendhegaon