शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजविण्यासाठी तरुणाई आली धावून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:10 IST

गुमगाव : नागपूर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या जबलपूर-अमरावती या बाह्य वळण मार्गावर ठिकठिकाणी मोठेमोठे खड्डे पडले ...

गुमगाव : नागपूर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या जबलपूर-अमरावती या बाह्य वळण मार्गावर ठिकठिकाणी मोठेमोठे खड्डे पडले असल्याने, या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. संबंधितांकडे वारंवार तक्रार करूनही रस्ता दुरुस्ती केला जात नसल्याने गुमगाव-कोतेवाडा-वागदरा येथील तरुणांनी अखेर लोकवर्गणी जमा करून ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला.

या बाह्य वळण मार्गाचे काम गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे. मध्ये मध्ये काही ठिकाणी रोडचे काम अपूर्ण आहे. परिणामी, येथे मोठे खड्डे पडले असून पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताने प्रवाशांचे कमालीचे हाल होत आहेत. या रस्त्यावरून वाहन चालविताना खड्डे चुकविण्यासाठी वाहन चालकांना सतत तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र पावसाळ्याचे तीन महिने उलटल्यानंतरही या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. परिणामी, मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता वर्तविल्या जात असताना गुमगाव, कोतेवाडा, वागदरा येथील युवकांनी वर्गणी जमा करून मुरुम-गिट्टीचा वापर करून जेसीबी मशीनद्वारे तात्पुरते खड्डे बुजविण्यात आले आहेत. संबंधित विभागाने १५ दिवसात वेळीच दखल घेऊन तातडीने कायमची दुरुस्ती करावी अन्यथा चक्का जाम आंदोलन करण्याचा इशाराही तरुणांनी दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद फुलकर, माजी सरपंच रवींद्र आष्टनकर, उपसरपंच अशोक फुलकर, अरविंद वाळके, उपसरपंच किशोर पडवे, चंद्रकांत झाडे, दामू दुर्गे, भारत चोपकर, मयूर फुलकर, गणेश पांडे, दीपक सोनकुसळे, आकाश बावणे, विजय गंधारे यांच्यासह अनेक युवकांनी खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.