शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

नागपुरात मोकाट कुत्र्यांनी घेतला तरुणाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 8:53 PM

मोकाट कुत्र्यांनी महेंद्रनगरात एका तरुणाचा बळी घेतला. दुचाकीमागे धावणा-या कुत्र्यापासून स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याची दुचाकी विजेच्या खांबाला धडकली. त्यामुळे कुणाल कृष्णाजी अडकिने (वय २३, रा. बाळूनगर, बिनाकी लेआऊट) या तरुणाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देदुचाकीमागे धावणा-या कुत्र्यापासून वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी विजेच्या खांबाला धडकली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोकाट कुत्र्यांनी महेंद्रनगरात एका तरुणाचा बळी घेतला. दुचाकीमागे धावणा-या कुत्र्यापासून स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याची दुचाकी विजेच्या खांबाला धडकली. त्यामुळे कुणाल कृष्णाजी अडकिने (वय २३, रा. बाळूनगर, बिनाकी लेआऊट) या तरुणाचा मृत्यू झाला.गेल्या आठवड्यात रात्री १२.३० च्या सुमारास कुणाल आपले काम आटोपून मित्रासोबत दुचाकीने घराकडे जात होता. महेंद्रनगरातील विद्यासागर शाळेजवळ मोकाट कुत्री बसून होती. कुणालने त्यांच्या बाजूने दुचाकी काढताच कुत्र्यांचे टोळके जोरजोरात भुंकत त्याच्या मागे लागले. घाबरलेल्या कुणालने कुत्र्यापासून स्वत:ला वाचविण्यासाठी दुचाकीची गती वाढविली. त्यात तो मागे फिरून कुत्र्याकडे बघत असताना त्याची दुचाकी चौकातील खांबावर धडकली. त्यामुळे कुणाल गंभीर जखमी झाला. त्याला आधी मेयोत आणि नंतर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याला शुक्रवारी दुपारी डॉक्टरांनी मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून पाचपावली पोलिसांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या खासकरून दुचाकी चालकांच्या मागे लागणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

 

टॅग्स :dogकुत्राDeathमृत्यू