युवकाला २.८२ लाखांच्या १४ किलो गांजासह अटक, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
By दयानंद पाईकराव | Updated: May 28, 2024 16:24 IST2024-05-28T16:23:07+5:302024-05-28T16:24:06+5:30
अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका युवकाला २.८२ लाखांच्या १४ किलो गांजासह अटक केली आहे.

युवकाला २.८२ लाखांच्या १४ किलो गांजासह अटक, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
नागपूर : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका युवकाला २.८२ लाखांच्या १४ किलो गांजासह अटक केली आहे. शुभम उर्फ विक्की रुपचंद शाहु (२८, रा. कश्यपच्या घरासमोर, कपिलनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कामठी रोडवरील उप्पलवाडी येथील जम-जम आईस फॅक्ट्रीच्या मागे राहणारा आरोपी शुभमची झडती घेतली असता त्याच्या जवळ २ लाख ८२ हजारांचा १४ किलो १२० ग्रॅम गांजा आढळला. आरोपीजवळून गांजा आणि मोबाईल असा एकूण २ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी शुभम विरुद्ध कलम ८ (क), २० (ब) (२) (ब) ए़नडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला कपिलनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई पथकाचे निरीक्षक राहुल शिरे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज घुरडे, विजय यादव, नितीन साळुंखे, पवन गजभिये, शेषराव रेवतकर, सहदेव चिखले, अनुप यादव यांनी केली.