पेट्रोल-डिझेल दरवाढीविरुद्ध आपचे ‘धक्का मारो’ आंदोलन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST2021-02-06T04:11:13+5:302021-02-06T04:11:13+5:30

नागपूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात गुरुवारी आम आदमी पार्टीतर्फे पंचशील चौकात ‘धक्का मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आपापल्या दुचाकीला ...

Your 'push' movement against petrol-diesel price hike () | पेट्रोल-डिझेल दरवाढीविरुद्ध आपचे ‘धक्का मारो’ आंदोलन ()

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरुद्ध आपचे ‘धक्का मारो’ आंदोलन ()

नागपूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात गुरुवारी आम आदमी पार्टीतर्फे पंचशील चौकात ‘धक्का मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आपापल्या दुचाकीला धक्का मारत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारची कामगिरी भारी, पेट्रोलने गाठली शंभरी, मोदी सरकारकडे करा अर्ज, पेट्रोल, डिझेलसाठी द्या आम्हाला कर्ज, अशा घोषणा दिल्या.

देवेंद्र वानखेड़े यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जगजित सिंग, अमरीश सावरकर, कृतल वेलेकर, आकाश सपेलकर, कविता सिंघल, शंकर इंगोले व नीलेश गोयल, भूषण ढाकूलकर, गिरीश तितरमारे, प्रतीक बावनकर, पराग जंगम, मयंक यादव, हरीश गुरबानी, हेमंत बनसोड, प्रमोद नाईक, अंबरीश सावरकर, उमाकांत बनसोड, सचिन पारधी, दीपक भटखारे, निखिल मेंदवडे, संजय जीवतोडे, राजेश तिवारी, सुनंदा समुद्रे, मनाई जोशी, राजेंद्र शेलकर, सुनील गोराडकर, अशिष गुप्ता, आकाश कावळे, जयश्री घाडगे, रोशन डोंगरे, अब्दुल सजनी, मोरेश्वर मोदेकर, सय्यद अली, शशिकांत रायपुरे, अजय धर्मे, प्रशांत निलाटकर, विनोद आलमडोकर, जगदिश रोकडे, संजय सिंग, विकी ठाकरे, बबलू मोहाडीकर, शंकर बावणे, मनोज कोल्हे, पियुश अकरे, अमित मोने, विक्की ठाकरे , लक्ष्मीकांत दांडेकर, जहांगीर शेख, विशाल पटले, जयश्री घाडगे, अलका पोपटकर आदींचा समावेश होता.

Web Title: Your 'push' movement against petrol-diesel price hike ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.