शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

तुम्ही फेकलेला कचरा कुणाचा जीव तर घेत नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 10:53 AM

‘तुम्ही फेकलेला कचरा कुणाचा जीव तर घेत नाही ना’, असा थेट प्रश्न विचारत एक भावस्पर्शी लघुपट शासकीय विज्ञान संस्थेच्या फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे.

ठळक मुद्देविज्ञान संस्था, फॉरेन्सिकच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी लघुपट सहा हजाराच्यावर लाईक्स

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या घरातून ओला, सुका व प्लास्टिक असा वेगवेगळा कचरा जमा होतो. मात्र हा तिन्ही प्रकारचा कचरा आपण एकाच ठिकाणी गोळा करून स्वच्छता कर्मचाऱ्यांजवळ देतो किंवा कुठेही फेकतो. त्याचे विलगीकरण करण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे बहुतेक वेळा तशीच विल्हेवाट लावली जाते. कचऱ्याच्या ज्वलनातून विषारी वायूचे उत्सर्जन होत असते.कचरा वेचणारे कामगार व मुले या विषारी कचऱ्यामुळे धोकादायक आजारांना बळी पडत आहेत. त्यामुळे ‘तुम्ही फेकलेला कचरा कुणाचा जीव तर घेत नाही ना’, असा थेट प्रश्न विचारत एक भावस्पर्शी लघुपट शासकीय विज्ञान संस्थेच्या फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. या लघुपटाला यु-ट्यूबवर चार दिवसात सहा हजाराच्यावर लाईक्स मिळाले आहेत.एका रिपोर्टनुसार आपल्या देशात दररोज १५,३४२ टन कचरा प्रत्यक्ष बाहेर येतो. त्यातील ६००० टन कचऱ्याची उचल होत नाही. भारतासारख्या विकसनशील देशात अयोग्य कचरा व्यवस्थापन, पुरेशा स्वच्छतेबाबत अज्ञान यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. २०१७ पासून अशा धोकादायक आजारांपासून २२१ स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बळी गेले असून यामध्ये मुलांची संख्या बरीच आहे. ही अवस्था या लघु चित्रपटामध्ये वास्तव रूपात सादर करण्यात आली आहे. फॉरेन्सिक सायन्सच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युटीच्या विद्यार्थ्यांनी ८.१२ मिनिटाचा हा लघुपट तयार केला आहे. विभागाचे सहायक प्राध्यापक व एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मालोजी भोसले यांच्या मार्गदर्शनात हा लघुपट तयार करण्यात आला.निर्मिती, दिग्दर्शन व अभिनय विद्यार्थ्यांनीच केला आहे. दिग्दर्शन मोक्षगण रेड्डी, एडिटींग शुभम राठोड व निर्मिती प्रा. भोसले यांची आहे. यामध्ये अंजली ईएस., शिवानी घोडके, सुश्रुत चाचरकर, पवन कल्याण, अश्विनी जायभाळ, संकेत जाधव, उमेश भोयर, मीनाक्षी अथुल्य यांनी भूमिका साकारल्या आहेत.यु-ट्यूबवर ९ आॅगस्टला या लघुपटाचे लॉन्चिंग झाले विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. आर.जी. आत्राम, डॉ. भाऊ दायदार, एनएसएसचे विद्यापीठ समन्वयक डॉ. केशव वाळके आदी उपस्थित होते.अनेकांनी चित्रपटाच्या विषयावर कमेंट्सही केल्या आहेत. प्रा. भोसले म्हणाले, हा दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय असूनही फारशी जागृती नाही.त्यामुळे हृदयस्पर्शी रुपात सादर करण्याचा प्रयत्न होता व तो पाहणाऱ्यांच्या हृदयाला भिडला याचा आनंद आहे. एनएसएसचे कार्य केवळ कॅम्प घेण्यापुरते मर्यादित नाही तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक गोष्टी याने साध्य होतात, हेही यामाध्यमातून दाखविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न