रेल्वेतून पडून तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:12 IST2021-09-05T04:12:45+5:302021-09-05T04:12:45+5:30

बुटीबाेरी : धावत्या रेल्वे गाडीतून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी परिसरात नुकतीच घडली. ...

Young woman dies after falling from train | रेल्वेतून पडून तरुणीचा मृत्यू

रेल्वेतून पडून तरुणीचा मृत्यू

बुटीबाेरी : धावत्या रेल्वे गाडीतून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी परिसरात नुकतीच घडली.

दिशा पुरुषाेत्तम शर्मा (२०, रा. हजारी पहाड, अणुशक्तीनगर, गिट्टीखदान, नागपूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. २७ ऑगस्टला सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास दिशा ही आपल्या वडिलांसह धामणगाव (रेल्वे) येथून पुणे स्पेशल रेल्वे गाडीने नागपूरला येत हाेती. दरम्यान, ती शाैचालयात जात असताना अचानकपणे ताेल गेल्याने ती रेल्वेच्या दारातून खाली पडली. त्यात तिच्या डाेक्याला, चेहऱ्याला व हातापायाला दुखापत झाली. लगेच तिला प्रथम बुटीबाेरी येथील खासगी हाॅस्पिटल व त्यानंतर नागपूर मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान २९ ऑगस्टला डाॅक्टरांनी तपासणीअंती मृत घाेषित केले. याप्रकरणी मेडिकल पाेलीस बूथच्या सूचनेवरून बुटीबाेरी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस नाईक प्रवीण देव्हारे करीत आहेत.

Web Title: Young woman dies after falling from train