ताेतया पाेलिसांनी तरुणास भरदिवसा लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:09 IST2021-03-07T04:09:57+5:302021-03-07T04:09:57+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क धामणा : माेटारसायकलने आलेल्या दाेघांनी आपण पाेलीस असल्याची बतावणी करीत काहींना दंडात्मक कारवाई करण्याची भीती दाखविली. ...

ताेतया पाेलिसांनी तरुणास भरदिवसा लुटले
लाेकमत न्यूज नेटवर्क
धामणा : माेटारसायकलने आलेल्या दाेघांनी आपण पाेलीस असल्याची बतावणी करीत काहींना दंडात्मक कारवाई करण्याची भीती दाखविली. त्यातच त्यांनी एका तरुणाकडील ४० हजार रुपये हिसकावून घेत पळ काढला. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा (लिंगा) शिवारात शनिवारी (दि. ६) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये धामणा (लिंगा) परिसरात शनिवारी बहुतांश दुकाने बंद ठेवण्यात आले हाेते. दाेन अज्ञात तरुण दुपारी धामणा येथील सुरेश पारधी (५५) यांच्या पानटपरीजवळ आले. आपण पाेलीस असल्याची बतावणी करीत त्यांना दुकान का सुरू आहे, अशी विचारणा केली, शिवाय १० हजार रुपये दंड ठाेठावण्याची धमकीही दिली. त्यातच त्यांनी सेटिंगचा प्रस्ताव ठेवला. त्यातच सुरेश पारधी यांनी आपली पाेलिसांशी ओळख असून, त्यांना फाेन करीत असल्याचे सांगताच, त्या दाेघांनीही लगेच सातनवरीच्या दिशेने पळ काढला.
सुनील वासेकर (३०), श्याम फलके (२८) व पंढरी सरोदे (३३) तिघेही रा. धामणा (लिंगा) धामणा शिवारातील तुळशीराम बेहेरे यांच्या शेतातील बंद धाब्याजवळ रक्कम माेजत उभे हाेते. सुनील वासेकर बिल्डिंग मटेरियल पुरविण्याचे काम करताे. त्याचवेळी दाेघेही तिथे आले. आपण पाेलीस असल्याचे सांगून ही रक्कम चाेरून आणल्याचा आराेप त्यांनी सुनीलवर केला. त्यांनी त्या रकमेसाेबत सुनीलचा फाेटाेही काढला. त्यानंतर, ती रक्कम घेऊन पाेबारा केला. या ताेतया पाेलिसांनी ४० हजार रुपये लुटल्याची माहिती सुनील वासेकर याने पाेलिसांना दिली. माहिती मिळताच एसीपी अशाेक बागूल, ठाणेदार सारीन दुर्गे, गुन्हे शाखेचे सहारे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. या प्रकरणी हिंगणा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.