भावजी-मेव्हण्याचा वाद सोडवायला गेला आणि जखमी झाला..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:32 IST2021-02-13T11:31:39+5:302021-02-13T11:32:00+5:30
Nagpur News भावजी व मेव्हण्यात सुरू असलेल्या वादात हस्तक्षेप करणा?्या युवकास तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना सदरच्या खदान वस्तीत घडली.

भावजी-मेव्हण्याचा वाद सोडवायला गेला आणि जखमी झाला..
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भावजी व मेव्हण्यात सुरू असलेल्या वादात हस्तक्षेप करणा?्या युवकास तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना सदरच्या खदान वस्तीत घडली. युवकाने हल्लेखोरालाही तलवारीने जखमी केले. खदान येथील रहिवासी राहुल गुरगेवार (३९) दुपारी २ वाजता घरी जात होता. त्यावेळी वस्तीतील विक्रम कुंभारे आपला मेव्हणा विक्रमसोबत मारपीट करीत होता. ते पाहून राहुलने दोघांना समजविण्याचा प्रयत्न केला. आपले म्हणणे न ऐकल्यामुळे राहुलने विक्रमला चापट मारली. त्यानंतर दोघे तेथून निघून गेले. राहुल आपल्या घरी परतला. काही वेळानंतर विक्रम तलवार घेऊन तेथे आला. त्याने राहुलला शिवीगाळ करणे सुरू केले. त्याने तलवारीने राहुलला जखमी केले. राहुलनेही त्याच्या जवळून तलवार हिसकावून त्याच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे विक्रम जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सदर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी राहुल आणि विक्रमविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.