ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:12 IST2021-08-13T04:12:05+5:302021-08-13T04:12:05+5:30
अभिषेक कुमार पाल (वय १९, रा. कटरा, जि. कानपूर, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. ताे त्याचे काका बिपीनकुमार ...

ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
अभिषेक कुमार पाल (वय १९, रा. कटरा, जि. कानपूर, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. ताे त्याचे काका बिपीनकुमार सुरेशचंद्र पाल (३९, रा. कटरा) यांच्यासाेबत ट्रकने हरियाणाहून हैदराबादला जात हाेता. सर्वजण कन्हान परिसरातील धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबले असताना ताे ट्रकमध्येच बसून हाेता. त्यातच टीएस-०३/यूसी-२१२९ क्रमांकाच्या ट्रकने उभ्या ट्रकला धडक दली. त्यात अभिषेककुमार गंभीर जखमी झाला. त्याला लगेच कन्हान येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी ट्रकचालक विनीतकुमार अवस्थी (३८, रा. सरय्या, जि. कानपूर, उत्तर प्रदेश) याचा शाेध घेणे सुरू केले आहे. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.