अपघातात तरुणाचा मृत्यू, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST2021-02-14T04:10:05+5:302021-02-14T04:10:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : भरधाव ट्रकने माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, त्याचा ...

अपघातात तरुणाचा मृत्यू, एक जखमी
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : भरधाव ट्रकने माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाय पाॅइंटजवळ शुक्रवारी (दि. १२) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
संकेत शरद गाजुई (२२) असे मृताचे तर आकाश हरिभाऊ दाते (२३) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. दाेघेही मित्र असून, ते कांडली, ता. समुद्रपूर, जिल्हा वर्धा येथील रहिवासी आहेत. शिवाय, ते बुटीबाेरी एमआयडीसी परिसरातील सनविजय नामक कंपनीमध्ये नाेकरी करायचे. शुक्रवारी रात्री कंपनीतील काम आटाेपल्यानंतर दाेघेही एमएच-३२/एएन-०३४७ क्रमांकाच्या माेटरसायकलने बुटीबाेरीहून कांडलीला जायला निघाले. ते नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गाला जाेडणाऱ्या वर्धा मार्गाजवळ अर्थात वाय पाॅइंटजवळ पाेहाेचताच मागून वेगात आलेल्या एमएच-४०/बीएल-६७२५ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली.
त्यात दाेघांनाही गंभीर दुखापत झाली. मात्र, संकेतचा काही वेळात घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी आकाशला उपचारांसाठी तर संकेतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविला. पाेलीस घटनास्थळी दाखल हाेईपर्यंत ट्रकचालक ट्रकसह घटनास्थळाहून पळून गेला हाेता. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनटक्के करीत आहेत.