दुचाकी अपघातात तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:09 IST2021-05-10T04:09:17+5:302021-05-10T04:09:17+5:30

बुटीबाेरी : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव दुचाकी घसरली. त्यात दुचाकीवर मागे बसलेला तरुण जखमी झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ...

Young man injured in two-wheeler accident | दुचाकी अपघातात तरुण जखमी

दुचाकी अपघातात तरुण जखमी

बुटीबाेरी : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव दुचाकी घसरली. त्यात दुचाकीवर मागे बसलेला तरुण जखमी झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी शिवारात शनिवारी (दि. ८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

अवलेश चंपालाल उईके (वय २२, रा. लास, जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अवलेश हा गाेपाल सुरेश चाैधरी (२८, रा. वांढा, ता. माेहखेड, जि. छिंदवाडा) यांच्यासाेबत एमएच-३१/ईजे-३२०८ क्रमांकाच्या दुचाकीने येत असताना, सावंगी शिवारात दुचाकीचालक गाेपालचा भरधाव दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी घसरून अवलेश खाली पडून जखमी झाला. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी त्याला खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. या प्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३३८ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार असलम करीत आहेत.

Web Title: Young man injured in two-wheeler accident