प्राणघातक हल्ल्यात तरुण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:08 IST2021-07-17T04:08:05+5:302021-07-17T04:08:05+5:30
नरखेड : क्षुल्लक कारणावरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि दाेघांपैकी एकाने तरुणावर चाकूने वार केले. त्यात तरुण गंभीर जखमी ...

प्राणघातक हल्ल्यात तरुण जखमी
नरखेड : क्षुल्लक कारणावरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि दाेघांपैकी एकाने तरुणावर चाकूने वार केले. त्यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना नरखेड शहरात बुधवारी (दि. १४) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
साहील रुईस शहा (२१, रा. नरखेड) असे जखमीचे, तर राॅबिन नारनवरे, शुभम डाेंगरे (दाेघेही रा. नरखेड) अशी आराेपींची नावे आहेत. साहील व त्याचा मित्र साेनू शहा हे नरखेड शहरातील जयस्तंभ चाैकाकडे जात हाेते. त्यातच रॉबिन त्यांना शर्ट काढून फिरत असल्याचे दिसले. त्यामुळे साेनूने त्याला शर्ट काढून का फिरत आहेस, अशी विचारणा केली. त्यावर राॅबिनने त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास साहील नरखेड शहरातील महात्मा गांधी चाैकात उभा असताना राॅबिन व शुभम त्याच्याजवळ आले. राॅबिनने त्याच्या पाेटावर चाकूने वार केले. यात साहील गंभीर जाखमी झाला असून, त्याला उपचारार्थ नरखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी नरखेड पाेलिसांनी भादंवि ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून दाेन्ही आराेपींना अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक ब्रह्मदेव देशमुख करीत आहेत.