पेंच नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST2021-02-08T04:08:59+5:302021-02-08T04:08:59+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : मित्रांसाेबत अंघाेळ करण्यासाठी पेंच नदीच्या डाेहात उतरलेला तरुण खाेल पाण्यात गेला आणि पाेहता येत ...

Young man drowns in Pench river | पेंच नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

पेंच नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्क

पारशिवनी : मित्रांसाेबत अंघाेळ करण्यासाठी पेंच नदीच्या डाेहात उतरलेला तरुण खाेल पाण्यात गेला आणि पाेहता येत नसल्याने बुडाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाेगरा शिवारात रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

राजेश गंगाराम मुंदाफळे (३३, रा. बिनाकी मंगळवारी, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. राजेश त्याच्या नऊ मित्रांसाेबत पारशिवनी तालुक्यातील श्रीक्षेत्र घाेगरा परिसरात फिरायला आला हाेता. त्या सर्वांनी वाहनातील साहित्य काढले आणि लगतच्या पेंच नदीच्या पात्राजवळ गेले. पात्रात भरपूर पाणी असल्याने अंघाेळ करण्याचा माेह अनावर झाला. त्यामुळे राजेशसह त्याचे काही मित्र पाचात अंघाेळ करण्यासाठी उतरले. अंघाेळ करीत असताना राजेश अनवधानाने पात्रातील डाेहात गेला.

खाेल पाण्यात गेल्याने तसेच पाेहता येत नसल्याने ताे गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार लक्षात येताच दाेघांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली आणि बाहेर काढले. मात्र, ताेपर्यंत राजेश गतप्राण झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Young man drowns in Pench river