दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:14 IST2021-02-18T04:14:23+5:302021-02-18T04:14:23+5:30
भिवापूर : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकी स्लिप झाली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य एक ...

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
भिवापूर : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकी स्लिप झाली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य एक जखमी झाला. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेखाडा येथे मंगळवारी (दि.१६) सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
गंगाधर विठ्ठल उईके (३५, रा. माेखाडा) असे मृत तरुणाचे नाव असून, शुभम रवींद्र मघाम (२१, रा. माेखाडा) असे जखमीचे नाव आहे. आराेपी दुचाकीचालक वैभव विठ्ठल सावसागडे (२४, रा. माेखाडा) हा मृत गंगाधर व शुभम यांना ट्रिपल सीट बसवून भिवापूर येथून माेखाडा येथे जात हाेता. दरम्यान, दुचाकीचालक वैभवचे नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकी स्लिप झाली व मागे बसलेल्या गंगाधरला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर शुभम जखमी झाला. अपघातानंतर दुचाकीचालक वैभव हा तेथून पळून गेला. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक भस्मे करीत आहेत.