विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:07 IST2021-07-02T04:07:37+5:302021-07-02T04:07:37+5:30

जलालखेडा : कूलर सुरू करीत असताना तरुणाला विजेचा जबर धक्का लागला. त्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा ...

Young man dies of electric shock | विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

जलालखेडा : कूलर सुरू करीत असताना तरुणाला विजेचा जबर धक्का लागला. त्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा पाेलीस ठाण्यांतर्गतच्या खरबडी येथे गुरुवारी (दि. १) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

शुभम प्रकाशराव चाेरे (२२, रा. खरबडी, ता. नरखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास घरातील कूलर सुरू करीत असताना, शुभमला विजेचा जाेरदार धक्का लागला. ही बाब ध्यानात येताच गावातील नागरिकांनी त्याला जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान शुभमचा मृत्यू झाला. शुभमच्या अकाली मृत्यूमुळे गावात शाेककळा पसरली आहे. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, ठाणेदार हरिश्चंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनात तपास पाेलीस हवालदार माेरेश्वर चलपे करीत आहेत.

010721\img-20210701-wa0389.jpg

फोटो ओळी. करंट लागून मृत्यू झालेला शुभम प्रकाशराव चोरे

Web Title: Young man dies of electric shock