तरुणाची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:14 IST2021-08-17T04:14:16+5:302021-08-17T04:14:16+5:30

सावनेर : तरुणाने झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सावनेर येथील वेकाेलि परिसरात असलेल्या गुरुबाबा मंदिराजवळ साेमवारी (दि. ...

Young man commits suicide by hanging | तरुणाची गळफास लावून आत्महत्या

तरुणाची गळफास लावून आत्महत्या

सावनेर : तरुणाने झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सावनेर येथील वेकाेलि परिसरात असलेल्या गुरुबाबा मंदिराजवळ साेमवारी (दि. १६) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. त्याच्या मृत्यूबाबत परिसरात तर्कवितर्क लावले जात आहेत.

आनंद धनसिंग मरकाम (२३, रा. वेकोलि क्वाॅर्टर, शक्तीनगर, वाघोडा, सावनेर) असे मृताचे नाव आहे. त्याला दारूचे व्यसन असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. ताे रविवारी (दि. १५) रात्री दारू पिऊन घरी आल्याने कुटुंबीयांनी त्याला याबाबत विचारणा केली हाेती. त्यामुळे रागाच्या भरात जेवण न करता ताे घरून निघून गेला हाेता. कुटुंबीयांनी त्याचा शाेध घेतला. मात्र, ताे कुठेही आढळून आला नाही. त्यानंतर साेमवारी सकाळी वेकाेलि काेळसा खाण परिसरातील गुरुबाबा मंदिराजवळ असलेल्या झाडाला ताे लटकलेल्या आवस्थेत आढळून आला.

माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक फाैजदार देवशंकर गुप्ता करीत आहेत.

Web Title: Young man commits suicide by hanging