तरुणाची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:54+5:302021-06-02T04:08:54+5:30
सावनेर : तरुणाने आरामशीनच्या लाेखंडी हॅण्डलला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सावनेर शहरात नुकतीच घडली. करण धरमसिंग नवरे ...

तरुणाची गळफास लावून आत्महत्या
सावनेर : तरुणाने आरामशीनच्या लाेखंडी हॅण्डलला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सावनेर शहरात नुकतीच घडली.
करण धरमसिंग नवरे (२८, रा. बिछवा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. ताे सावनेर शहरातील सटवा माता मंदिर परिसरातील आरामशीनवर कामगार म्हणून काम करायचा. त्याला दारूचे व्यसन असल्याची माहिती जाणकार व्यक्तीने दिली. दारूच्या नशेत असताना त्याने आरामशीनच्या लाेखंडी हॅण्डलला दाेरीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात पाठविला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी सावनेर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार नारायण बाेरकर करीत आहेत.