तरुणाची गळफास लावून आत्म्हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:08 IST2021-05-01T04:08:03+5:302021-05-01T04:08:03+5:30

खापरखेडा : तरुणाने दारूच्या नशेत घरासमाेरील झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या ...

Young man commits suicide by hanging | तरुणाची गळफास लावून आत्म्हत्या

तरुणाची गळफास लावून आत्म्हत्या

खापरखेडा : तरुणाने दारूच्या नशेत घरासमाेरील झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर येथे बुधवारी (दि. २८) मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली.

जय ऊर्फ छाेटू सुरेश बेहार (१९, रा. चनकापूर, ता. सावनेर) असे मृताचे नाव आहे. जयला दारूचे व्यसन हाेते. ताे बुधवारी रात्री दारू पिऊन घरी आला हाेता. काही वेळाने ताे कुणालाही न सांगता घराबाहेर पडला. ताे घरी नसल्याचे पाहून कुटुंबीयांनी मध्यरात्री त्याचा परिसरात शाेध घेतला. त्यावेळी ताे घरासमाेरील नर्सरीत असलेल्या सिसमच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार सूर्यभान जळते करीत आहेत.

Web Title: Young man commits suicide by hanging