आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:08 IST2021-07-16T04:08:00+5:302021-07-16T04:08:00+5:30
कुही : सततच्या आजारपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भाेजापूर ...

आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या
कुही : सततच्या आजारपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भाेजापूर येथे गुरुवारी (दि.१५) दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
दिलीप दयाराम ढबाले (३७, रा. भाेजापूर, ता. कुही) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत दिलीप हा गेल्या काही दिवसापासून क्षयराेगाने ग्रस्त हाेता. त्याला दारूचे व्यसन हाेते. त्यामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली हाेती, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी पाेलिसांना दिली. दरम्यान, गुरुवारी घरी कुणीच नसताना छताच्या पंख्याला दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास लावून
तो मृतावस्थेत आढळून आला. ही बाब लक्षात येताच त्याच्या भावाने पाेलिसांना सूचना दिली. याप्रकरणी कुही पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार नामदेव पुजारी करीत आहेत.