तरुणास मारहाण, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:27 IST2020-12-16T04:27:24+5:302020-12-16T04:27:24+5:30

बुटीबाेरी : कामाच्या ठिकाणी कामावरून तीन आराेपी व फिर्यादी तरुणामध्ये वाद झाला. यावरून आराेपींनी तरुणाचे घर गाठून त्यास मारहाण ...

Young man beaten, three arrested | तरुणास मारहाण, तिघांना अटक

तरुणास मारहाण, तिघांना अटक

बुटीबाेरी : कामाच्या ठिकाणी कामावरून तीन आराेपी व फिर्यादी तरुणामध्ये वाद झाला. यावरून आराेपींनी तरुणाचे घर गाठून त्यास मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदवून तिघांना पाेलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुटीबाेरी येथील वाॅर्ड क्र. ३ येथे साेमवारी (दि.१४) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

आकाश चिंतामण वाघाडे (२५, रा. वाॅर्ड क्र. ३, बुटीबाेरी) असे जखमी तरुणाचे नाव असून, गाेलू माेरे, नितीन माेरे व बबन बुरे तिघेही रा. बुटीबाेरी, अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. जखमी व तिन्ही आराेपी हे एकाच ठिकाणी काम करीत असून, कामाच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला हाेता. दरम्यान, आराेपी नितीन माेरे याने आकाशच्या घरी जाऊन त्याचा माेठा भाऊ राहुल वाघाडे यास ‘तुझ्यासाेबत बाेलायचे आहे’ असे म्हणत राहुलशी वाद घातला. आराेपी राहुलला मारहाण करीत असल्याने आकाशने भांडण साेडविण्याचा प्रयत्न केला असता, आराेपी गाेलू माेरे याने लाेखंडी राॅडे मारहाण करीत आकाशला जखमी केले. शिवाय आराेपी नितीन व बबन या दाेघांनाही आकाशला हातबुक्कीने मारहाण केली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तिन्ही आराेपींना अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस हवालदार नांदूरकर करीत आहेत.

Web Title: Young man beaten, three arrested