चाकू हल्ल्यात तरुण जखमी

By Admin | Updated: February 15, 2017 03:17 IST2017-02-15T03:17:34+5:302017-02-15T03:17:34+5:30

जुन्या वैमनस्यातून दोघांनी तरुणावर चाकू हल्ला केला. त्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, हल्ला करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली.

Young injured in knife attack | चाकू हल्ल्यात तरुण जखमी

चाकू हल्ल्यात तरुण जखमी

दोघांना अटक : कामठीच्या कुंभारे कॉलनीतील घटना
कामठी : जुन्या वैमनस्यातून दोघांनी तरुणावर चाकू हल्ला केला. त्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, हल्ला करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. ही घटना कामठी शहरातील कुंभारे कॉलनीत रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
इरफान शेख (२४, रा. कुंभारे कॉलनी, कामठी) असे जखमी तरुणाचे नाव असून, अश्वजित मेश्राम व अरविंद हिरेखण दोघेही रा. कामठी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अश्वजित व अरविंदचा इरफान शेख याच्यासोबत वाद होता. त्यामुळे दोघेही वचपा घेण्याच्याच विचारात होते.
दरम्यान, रविवारी रात्री इरफान या दोघांना कुंभारे कॉलनीत भेटला. त्यांनी इरफानसोबत भांडायला सुरुवात केली. वाद विकोपास जाताच दोघांनीही इरफानच्या पोटावर चाकूने वार करायला सुरुवात केली. यात गंभीर जखमी झाल्याने इरफान खाली कोसळला. दोघांनीही घटनास्थळाहून पळ काढला.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी इरफानला लगेच कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.
या प्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी इरफान शेख याच्या तक्रारीवरून भादंवि ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आणि दोन्ही आरोपींना लगेच अटक केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Young injured in knife attack