कलेच्या संवर्धनाप्रति तरुण पिढी गंभीर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:39 AM2017-10-17T00:39:33+5:302017-10-17T00:39:48+5:30

आजच्या काळात प्रत्येक कलाकाराला लवकरात लवकर यश अपेक्षित आहे. त्यामुळे कलेच्या क्षेत्राचे व्यावसायिकीकरण झाले आहे.

Young generation is not serious for the promotion of art | कलेच्या संवर्धनाप्रति तरुण पिढी गंभीर नाही

कलेच्या संवर्धनाप्रति तरुण पिढी गंभीर नाही

Next
ठळक मुद्देरोजा कन्नन : कलेचा आनंद घेणे शिकले पाहिजे

अंकिता देशकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजच्या काळात प्रत्येक कलाकाराला लवकरात लवकर यश अपेक्षित आहे. त्यामुळे कलेच्या क्षेत्राचे व्यावसायिकीकरण झाले आहे. कलेच्या संवर्धनाप्रति तरुण पिढी गंभीर नाही, असे मत प्रख्यात भरतनाट्यम् नृत्यांगना रोजा कन्नन यांनी व्यक्त केले. तरुणांसाठी आयोजित भरतनाट्यम् कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी नागपुरात आल्या असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला
रोजा कन्नन या गुरू आदयर के लक्ष्मण आणि कलानिधी नारायणन् यांच्यासारख्या गुरूंच्या शिष्या आहेत.
भरतनाट्यम्सह कलेच्या प्रत्येक क्षेत्राचेच व्यावसायिकीकरण झाले आहे. अगोदरच्या काळात लवकर मंच उपलब्ध होत नसे. मात्र आता कलाकारांना सादरीकरणासाठी विविध मंच सहज उपलब्ध आहेत. अगदी इंटरनेटवरदेखील सहजपणे काम ‘अपलोड’ करता येणे शक्य आहे. मात्र कलेच्या दर्जाशी यामुळे तडजोड होताना दिसते, असे त्या म्हणाल्या.
मात्र असे असले तरी काही कलाकार अद्यापही मुळाशी चिकटून आहेत.
भविष्यात नक्कीच सर्व कलाकार परत मुळाकडे जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज नव्या कलाकारांवर अपेक्षांचे ओझे लादण्यात येते. मात्र त्यापेक्षा कलेचा आनंद कसा लुटता येईल, याबाबत त्यांना मार्गदर्शन दिले गेले पाहिजे. पाश्चिमात्य देशांमध्ये भारतीय शास्त्रीय नृत्य शिकण्याकडे कल वाढतो आहे ही सकारात्मक बाब आहे, असे त्यांनी म्हटले.
कलाकारांनी कलेचे कौशल्य आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे, असा सल्लादेखील त्यांनी दिला.

Web Title: Young generation is not serious for the promotion of art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.