तरुणाचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:27 IST2019-07-12T00:26:30+5:302019-07-12T00:27:55+5:30

मौजमस्ती करीत मासेमारीसोबतच पोहण्यासाठी कन्हान नदीच्या पात्रात उतरलेल्या सहा मित्रांपैकी एकाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कामठी परिसरात गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.

The young drowned death in Kanhan River | तरुणाचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

तरुणाचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

ठळक मुद्देपोहण्याचा मोह अंगलट : कामठी परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कामठी) : मौजमस्ती करीत मासेमारीसोबतच पोहण्यासाठी कन्हान नदीच्या पात्रात उतरलेल्या सहा मित्रांपैकी एकाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कामठी परिसरात गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.
विलास ऊर्फ गोलू नरेश मानकर (२२, रा. पाचपावली, नागपूर) असे मृताचे नाव आहे. विलास त्याच्या सुरेंद्र बेंदाडे, धर्मपाल मेश्राम, अश्विन लडे, सूरज वानखेडे, सचिन पाटील सर्व रा. पाचपावली, नागपूर यांच्यासोबत कामठी परिसरात फिरायला आला होता. ते पात्रातील डोहाजवळ फिरत असताना त्यांनी सुरुवातीला मासेमारी सुरू केली. त्यानंतर पोहण्याचा मोह झाल्याने ते पाण्यात उतरले. त्यातच विलास खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला. इतरांनी त्याचा वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही.
त्यांनी लगेच नदीबाहेर येऊन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोधमोहिम सुरू केली. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर विलासचा मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उत्तारीय तपासणी प्रक्रिया आटोपल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: The young drowned death in Kanhan River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.