बसल्या जागी कळेल, कुठे खराब आहे जलवाहिनी

By निशांत वानखेडे | Published: April 10, 2023 12:11 PM2023-04-10T12:11:38+5:302023-04-10T12:13:02+5:30

नीरीचे ‘रिस्क पिनेट २.०’ने समजेल : भारतात विकसित झालेले एकमेव ॲप

You will know at the sitting place, where the water channel is bad, Neery developed the 'Risk Pinet 2.0' software | बसल्या जागी कळेल, कुठे खराब आहे जलवाहिनी

बसल्या जागी कळेल, कुठे खराब आहे जलवाहिनी

googlenewsNext

निशांत वानखेडे

नागपूर : शहरातील जलवाहिनी, सांडपाण्याची पाइपलाइन लिकेज हाेणे, खराब हाेणे, फुटणे ही नित्याचीच बाब आहे. मग ही पाइपलाइन कुठे खराब किंवा लिकेज आहे, हे शाेधणे माेठी डाेकेदुखी ठरते. इथे खाेद, तिथे खाेदा करीत परिसरात खाेदकाम हाेते. मात्र ही डाेकेदुखी चुटकीसरशी सुटू शकते. एक छाेटे ॲप खाेदकाम न करता बसल्या जागी प्रशासनाला जलवाहिनीची समस्या नेमकी काेणत्या जागी आहे, हे अचूक सांगू शकेल.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी)ने ‘रिस्क पिनेट २.०’ हे ॲप विकसित केले आहे. क्लिनिंग टेक्नाॅलाॅजी ॲण्ड माॅडेलिंग डिव्हिजनच्या वैज्ञानिक डाॅ. आभा सारगावकर आणि प्रधान वैज्ञानिक आशिष शर्मा यांनी हे ॲप विकसित केले. डाॅ. आभा यांनी गणितीय माॅडेल तयार केले तर शर्मा यांनी त्यानुसार साॅफ्टवेअर विकसित केले आहे. नागपूर महापालिकेसह नाशिक, चेन्नई, हैदराबाद, वर्धा येथे प्रशासनाने या ॲपवर यशस्वी प्रयाेग केला आहे. हे जीआयएसवर आधारित साॅफ्टवेअर असून, भारतीय परिस्थितीचा विचार करून बनविलेले देशतील एकमेव ॲप असल्याचा दावा आशिष शर्मा यांनी केला. हे पूर्णपणे तयार असून, व्यावसायिक उपयाेगासाठी रेडी असल्याचे त्यांनी सांगितले.

५०, १०० वर्षांच्या पाइपलाइनची स्थिती कळेल

नीरीने आधी रिस्क पिनेट ॲप विकसित केले; पण खरी अडचण पाइपलाइनच्या डेटाची हाेती. शहरात टाकलेल्या जलवाहिनीचा नकाशा मिळेलच असे नाही. ही अडचण लक्षात घेत वैज्ञानिकांनी संपूर्ण पाइपलाइनचा डाटा साठवून ठेवण्यासाठी पाेर्टल तयार केले. ‘सॅफ्रा डब्ल्यूडीएस’ असे या पाेर्टलचे नाव आहे. पाइपलाइनचा संपूर्ण नकाशा या पाेर्टलवर साठवून ठेवायचा. त्यात काेणत्या वेळी पाइपलाइन टाकली हाेती, त्यात दुरुस्ती केली, नवा पाइप टाकला आदी माहिती अपलाेड करायची. यावरून काेणता पाइप, किती वर्ष जुना, व्यास किती, पाण्याचे प्रेशर किती, अशा गणितीय माहितीच्या आधारे पाइप किती वर्षे टिकेल, दुरुस्ती कधी करावी लागेल, कधी बदलवावा लागेल, हे सहज सांगता येईल. पाेर्टलशी जाेडलेल्या रिस्क पिनेट २.० या ॲपने ५०, १०० वर्षांची स्थिती अधिकाऱ्यांना समजेल.

रस्ते, सिव्हेज, पथदिव्यांची माहितीही अपलाेड करता येते

‘सॅफ्रा डब्ल्यूडीएस’ पाेर्टलवर जलवाहिनीच नाही तर रस्ते, सिव्हेज, पथदिव्यांच्या कनेक्शनची माहितीही अद्ययावत करता येईल. हे पाेर्टल व ॲप नागरिकांसाठी नाही तर पूर्णपणे प्रशासनिक असेल. ॲपद्वारे अवैध नळ कनेक्शनची माहितीही समजू शकेल.

नगरसेवकांनी जाणले तंत्रज्ञान

दरम्यान, नीरीतर्फे ‘वन विक-वन लॅब’ उपक्रमांतर्गत रविवारी स्थानिक लाेकप्रतिनिधींसाठी शहर स्वच्छता, सांडपाणी अशा विविध समस्यांवर चर्चेसाठी संवाद कार्यक्रम आयाेजित करण्यात आला. शहरातील नागरी समस्या दूर करण्यासाठी विकसित तंत्रज्ञानाची माहिती वैज्ञानिकांनी दिली. यावेळी माजी नगरसेविका वंदना भगत, संगीता गिरे, प्रगती पाटील, परिणिता फुके, पिंटू झलके, राजेश घाेडपागे, संजय चावरे, जितेंद्र घाेडेस्वार, शेषराव गाेतमारे, लखन येरावार, उज्ज्वला शर्मा, संजय बंगाले आदी उपस्थित हाेते.

Web Title: You will know at the sitting place, where the water channel is bad, Neery developed the 'Risk Pinet 2.0' software

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.