शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

नागपुरात ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:02 IST

ट्रकच्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास जरीपटका हद्दीत कामठी रोड नाका नंबर २ जवळ घडला.

ठळक मुद्देकामठी रोड वरील अपघातएचडीएफसी बँकेत जॉबच्या मुलाखतीसाठी जाताना काळाने गाठले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रकच्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास जरीपटका हद्दीत कामठी रोड नाका नंबर २ जवळ घडला. अपराजिता नरेंद्र बोरकर (२४) रा. संताजीनगर कांद्री कन्हान असे मृत तरुणीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार अपराजिताने एमबीए पूर्ण केले होते. ती एचडीएफसी बँकेत जॉबच्या मुलाखतीसाठी जात होती. आपल्या दुचाकीने (क्र. एमएच ४०/एएस/५२४०)तीे नागपूरकडे रवाना झाली. या दरम्यान खैरी येथील रहिवासी हरपिंदरसिंग संधु (२५) ट्रक क्रमांक एमएच/३३/४५०० याने भरधाव आणि निष्काळजीपणे ट्रक चालवून अपराजिताच्या गाडीला मागून धडक दिली. ही धड इतकी मोठी होती की तरुणी सिमेंट रोडवर आदळली आणि ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालक आरोपी ट्रक सोडून पळाला. माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. सायंकाळी कन्हान नदीच्या काठावर अपराजीतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालकास अटक केली.वर्धा रोडवर कारच्या धडकेत एकाचा मृत्यूभरधाव वेगात असलेल्या एका कारच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री वर्धा रोडवर परसोडीजवळ घडली.किशोर साधुजी वासेकर (५५) रा. श्रमिकनगर परसोडी असे मृताचे नाव आहे. सोमवारी रात्री ९ वाजता वासेकर हे वर्धा रोडवर सिंग ढाब्याजवळून परसोडीकडे पायी जात होते. दरम्यान वर्ध्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या एका अज्ञात कार चालकाने वासेकरला जोरदार धडक दिली व पळून गेला. या अपघातात रस्त्यावर पडल्याने वासेकर यांच्या डोक्याला जबर मार बसून त्यांचा मृत्यू झाला. सिद्धांत वासेकर यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू