शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नागपुरातील मुलगी देतेय देश-विदेशात योगाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:40 PM

योग ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहून मानसिक शांती मिळते. त्यामुळे योगशास्त्रात पीएच.डी. करून नागपुरातील उदयनगर परिसरातील रहिवासी तनु वर्मा यांनी योगाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य सुरू केले.

ठळक मुद्देतनु वर्मा यांचे कार्य योगशास्त्रात केली पीएच.डी.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : योग ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहून मानसिक शांती मिळते. त्यामुळे योगशास्त्रात पीएच.डी. करून नागपुरातील उदयनगर परिसरातील रहिवासी तनु वर्मा यांनी योगाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य सुरू केले. भारताची संस्कृती असलेल्या योगाची माहिती विदेशातील नागरिकांना व्हावी यासाठी जपान, श्रीलंका, चीन, जर्मनी, रशिया, फिनलँड या देशात योगाचे धडे देऊन भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसाराचे मोलाचे कार्य त्या करीत आहेत.डॉ. तनु वर्मा असे या मुलीचे नाव आहे. त्यांच्यावर लहानपणापासून आध्यात्मिक संस्कार झाले. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती आणि मनाची शांती मिळत असल्यामुळे त्या योगाकडे वळल्या. त्यांनी देव संस्कृती विश्व विद्यालय हरिद्वार येथून ह्युमन कॉन्शसनेस अँड योगिक सायंस हा कोर्स करून त्याच विषयात पीएच.डी. पूर्ण केली. त्यानंतर नागपुरात योगा धरनेंद्र मल्टीपरपज चॅरिटेबल सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता विकास प्रशिक्षण, कराटे, योगा, मेडिटेशन, तबला, हार्मोनियम, गिटार, मंत्र, यज्ञ शिकविण्याचे कार्य केले. नागपुरात लॉयन्स क्लब, गायत्री परिवार, शिवशक्ती फाऊंडेशन आणि जेसीआय या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी योग शिबिरांचे आयोजन केले. योग ही भारताची संस्कृती आहे. त्यामुळे भारताच्या संस्कृतीची ओळख जगभरात व्हावी यासाठी त्यांनी विदेशात योग प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आजपर्यंत त्यांनी श्रीलंका, चीन, जपान, जर्मनी, रशिया, फिनलँड या देशात योग प्रशिक्षण दिले आहे. जपानमध्ये त्यांची ट्रॅडिशनल योग इन्स्टिट्युट ही संस्था आहे. या संस्थेत त्यांचे विद्यार्थी तेथील नागरिकांना योगाचे धडे देतात. विदेशात योग प्रशिक्षण दिल्यानंतर आता नागपुरात विविध ठिकाणी योग प्रशिक्षण वर्ग सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारताची संस्कृती असलेल्या योगाचा विदेशात प्रचार-प्रसार करण्याचे त्यांनी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.

टॅग्स :Yogaयोग