कोरोनापासून रक्षणासाठी मुस्लीम बांधवांनी केला योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST2021-04-16T04:08:38+5:302021-04-16T04:08:38+5:30

सत्य सनातन योग सेवा संस्थेच्या वतीने आयोजित हे सत्राचे तिसरे वर्ष असून, संस्थापक व अध्यक्ष योगसेवक केदार यांनी हे ...

Yoga performed by Muslim brothers to protect them from corona | कोरोनापासून रक्षणासाठी मुस्लीम बांधवांनी केला योग

कोरोनापासून रक्षणासाठी मुस्लीम बांधवांनी केला योग

सत्य सनातन योग सेवा संस्थेच्या वतीने आयोजित हे सत्राचे तिसरे वर्ष असून, संस्थापक व अध्यक्ष योगसेवक केदार यांनी हे आयोजन केले होते. या सत्रामध्ये दाऊदी बोहरा समाज व आगा खान समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते. २ ते ८ एप्रिल या काळात सकाळी सत्र झाले. या सात दिवसात पारंपरिक हठ-योग शुद्धिकरणाची क्रिया, सूर्यनमस्कार, आसन, प्राणायाम, मुद्रा, बंध, पूर्व ध्यान विधी, आयुर्वेदाचे घरगुती प्रयोग, तसेच योग आहारासंदर्भात माहिती देण्यात आली. क्रियात्मक अभ्यास करवून घेतला जाऊन तर्कयुक्त पद्धतीने वैज्ञानिक कारणमीमांसा करण्यात आली.

रशिदा फिदवी, डॉ. सोफिया आजाद, कॅनडातील निसरीन हुसैन, सबीहा वली, पर्ल जुजर आदी सहभागींनी या आयोजनाबद्दल आनंददायी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

डॉ. मीनाक्षी हांडे यांनी स्वानुभव कथन करून आयुर्वेद व योगाचे महत्त्व सांगितले. संस्थेच्या सचिव वर्षा गोयल यांनीही सहकार्य केले. योग सत्राच्या यशस्वीतेसाठी अमीना वली, जुमाना शकीर, रुकुइयाह मुर्तजा, इं. सारा शफीक, नीलोफर अजानी, फरहाना, इं. कमल नारायण सीठि व डॉ. निलय हांडे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Yoga performed by Muslim brothers to protect them from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.