यो यो हनीसिंगला जायचेय विदेशात : नागपूर सत्र न्यायालयात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:08 IST2019-01-21T23:06:22+5:302019-01-21T23:08:49+5:30

पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगने थायलंड, दुबई व ऑस्ट्रेलियात जाण्याची परवानगी मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या तिन्ही देशात त्याचे कार्यक्रम आहेत. त्याच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

Yo Yo Honey Singh to go abroad: Appeal in session court | यो यो हनीसिंगला जायचेय विदेशात : नागपूर सत्र न्यायालयात अर्ज

यो यो हनीसिंगला जायचेय विदेशात : नागपूर सत्र न्यायालयात अर्ज

ठळक मुद्देथायलंड, दुबई व ऑस्ट्रेलियात कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगने थायलंड, दुबई व ऑस्ट्रेलियात जाण्याची परवानगी मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या तिन्ही देशात त्याचे कार्यक्रम आहेत. त्याच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंगविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. हनीसिंग अश्लील गाणी गातो असा जब्बल यांचा आरोप आहे. २७ ऑक्टोबर २०१५ रोजी सत्र न्यायालयाने हनीसिंगला या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करताना पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे हनीसिंगने वरील तीन देशांत जाण्याची परवानगी मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी त्याला बँकॉक, दुबई, लंडन व हवाना येथे जाण्याची परवानगी देण्यात आली होती. हनीसिंगतर्फे अ‍ॅड. अतुल पांडे कामकाज पाहतील.

Web Title: Yo Yo Honey Singh to go abroad: Appeal in session court