यंदाची दिवाळी छोटे कारागीर आणि शिल्पकारांना ठरणार वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:44 AM2020-09-20T00:44:01+5:302020-09-20T00:45:04+5:30

भारत-चीन वादात दसरा-दिवाळी सणांमध्ये देशातील लाखो स्थानिक कारागीर, शिल्पकार आणि मध्यमवर्गीयांची कला, विचार आणि काम करण्याच्या शक्तीला संधी देताना आत्मनिर्भर बनविण्याचे अभियान कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकलवर व्होकल आणि आत्मनिर्भर अभियानाला स्थानिक स्तरावर प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

This year's Diwali will be a boon for small artisans and craftsmen | यंदाची दिवाळी छोटे कारागीर आणि शिल्पकारांना ठरणार वरदान

यंदाची दिवाळी छोटे कारागीर आणि शिल्पकारांना ठरणार वरदान

Next
ठळक मुद्देकॅटचे दिवाळीसाठी आत्मनिर्भर अभियान : भारत-चीन वादाचा फायदा मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत-चीन वादात दसरा-दिवाळी सणांमध्ये देशातील लाखो स्थानिक कारागीर, शिल्पकार आणि मध्यमवर्गीयांची कला, विचार आणि काम करण्याच्या शक्तीला संधी देताना आत्मनिर्भर बनविण्याचे अभियान कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकलवर व्होकल आणि आत्मनिर्भर अभियानाला स्थानिक स्तरावर प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅटने १० जूनला चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्याला देशात सर्व वर्गातील लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. याच कारणाने यावर्षी राखी आणि गणेश चतुर्थी सणात लोकांनी चिनी वस्तूंचा बहिष्कार करीत भारतीय वस्तूंची खरेदी केली. दिवाळी सणही भारतीय वस्तूंनी साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पूजा आणि सजावटीच्या भारतीय बनावटीच्या वस्तूंची विक्री करण्यास व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे.
गेल्यावर्षी चीनने भारतीय सणांमध्ये बाजारावर ताबा मिळविण्याची कोणतीही संधी सोडली नव्हती. पण आता भारतीय व्यापाऱ्यांनी सणांमध्ये बाजारपेठा चिनी वस्तूमुक्त करण्याचा संकल्प घेतला आहे. त्यातच ‘भारतीय वस्तू, माझा अभिमान’ या कॅटच्या अभियानाचा व्यापारी हिस्सा बनले आहेत. चीन दरवर्षी सणांमध्ये जवळपास ४० हजार कोटींच्या वस्तूंची निर्यात करते. पण कॅटच्या अभियानाने चीनला या वस्तूंच्या निर्यातीवर पाणी सोडावे लागले आहे.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, या अभियानांतर्गत यावर्षीच्या सणांच्या दिवसात कॅटने दिल्लीसह संपूर्ण देशात ३५० क्लस्टर नव्याने उदयास आणले आहे. दिवाळी सणांमध्ये पूजा आणि दुकान व घरांच्या सजावटीच्या वस्तू याच क्लस्टरमधून मिळणार आहे. या वस्तूंमध्ये भारताची प्राचीन परंपरा आणि संस्कृती दिसेल. यामध्ये मातीपासून तयार केलेले कलात्मक व पेंट केलेले दिवे, दारावर लावण्यात येणारी माळ, झुंबर, लक्ष्मीचे पाय, शुभ-लाभाचे चिन्ह, सजावटी झालर, हँगिंग, खादीपासून तयार सजावटी वस्तू, मोती, बीडपासून तयार वस्तू, मधुबनी व मैथिली पेंटिंगसह अनेक वस्तूंचा समावेश आहे.
या वस्तूंमधून पहिल्यांदा देशात अद्भूत कला, संस्कृती आणि गौरवशाली परंपरेचा संगम पाहायला मिळणार आहे. पूर्वीही अशा वस्तू देशात तयार व्हायच्या, पण त्यांना बाजारपेठ मिळत नव्हती. आता कॅटने बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. यातून सर्वजण आत्मनिर्भर बनणार आहे. तर दुसरीकडे संबंधित व्यापारी या वस्तू खरेदी करून कमी लाभासह देशात विकतील. या वस्तू व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत व्यापारी आणि लोकांनी न्याव्यात. त्यामुळे उत्पादकाला ऑनलाईऑर्डर मिळण्यास मदत होणार आहे.

Web Title: This year's Diwali will be a boon for small artisans and craftsmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.