रनाळा येथे याेगासन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST2021-01-16T04:11:02+5:302021-01-16T04:11:02+5:30
कामठी : रनाळा (ता. कामठी) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मैदानावर आराेग्य वर्धनी संस्थेच्या वतीने नुकतेच याेगासन शिबिराचे ...

रनाळा येथे याेगासन शिबिर
कामठी : रनाळा (ता. कामठी) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मैदानावर आराेग्य वर्धनी संस्थेच्या वतीने नुकतेच याेगासन शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात उपस्थितांना याेगासनाचे महत्त्व पटवून देत त्यांना याेगासनाचे प्रशिक्षण देण्यात आले.
याप्रसंगी सरपंच सुवर्णा साबळे यांनी निराेगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने नियमित याेगा करण्याचे आवाहन उद्घाटनपर भाषणात केले. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच आरती कुलरकर, मंगला ठाकरे, योग प्रशिक्षक डॉ. रश्मी शेंडे, डाॅ. वैशाली, अनुराधा नवले उपस्थित होते. डॉ. रश्मी शेंडे यांनी नागरिकांना प्राणायाम, त्रिकोणासन, पद्मासन,मयुरासन, ताडासन, कपालभाती, चक्रासनासह विविध योगासन प्रात्यक्षिकांवद्वारे शिकविले. शिवाय, याेगासनांचे मानवी जीवनात महत्त्वही समजावून सांगितले. यशस्वीतेसाठी मयुरी कांबळे, सपना गावंडे, लीना वंजारी, प्रांजल मेंढे, ममता गोंधुळे, पौर्णिमा गावंडे, तपस्या मुलमुले, आराध्य लढाऊ, जान्हवी भरे, वंश अबादरे यांनी सहकार्य केले.