शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

नागपुरातील यादव कुटुंबीयातील हिंसक भांडणाचा तपास गुन्हे शाखेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 10:56 PM

भाजपा नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव व अवधेश ऊर्फ पापा नंदलाल यादव यांच्या कुटुंबीयांमध्ये गेल्या २१ आॅक्टोबर रोजी रात्री झालेल्या हिंसक भांडणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील पत्र बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आले.

ठळक मुद्देहायकोर्टात माहिती : खुनाच्या प्रयत्नासह विविध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपा नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव व अवधेश ऊर्फ पापा नंदलाल यादव यांच्या कुटुंबीयांमध्ये गेल्या २१ आॅक्टोबर रोजी रात्री झालेल्या हिंसक भांडणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील पत्र बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आले.अवदेश यांच्या पत्नी नविता यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात यावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका प्रलंबित असताना शासनाने हा निर्णय घेतला. न्यायालयाने शासनाचे पत्र रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावरील सुनावणी एक आठवडा तहकूब केली. तसेच, याचिकाकर्तीला शासनाच्या निर्णयावर पुढच्या तारखेला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. अवधेश यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी मुन्ना यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अर्जुन यादव, लक्ष्मी यादव, करण यादव, बाला यादव, जग्गू यादव, सोनू यादव व इतरांविरुद्ध भादंविच्या कलम ४५२, ३०७, ३२३, ३२४, ३२५, १४१, १४३, १४७, १४८, १४९, शस्त्र कायद्याच्या कलम ४/२५ आणि महाराष्ट्र  पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुन्ना यादव यांचे बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्यामुळे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न होत आहेत. पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. प्रकरणाचा चुकीच्या पद्धतीने तपास केल्या जात आहे असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस