कस्तूरचंद पार्कजवळ साकारणार ‘वाय शेप’चा उड्डाणपूल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST2021-01-08T04:18:40+5:302021-01-08T04:18:40+5:30

नागरिकांची सुविधा : वाहतुकीची कोंडी होणार दूर नागपूर : सेंट्रल एव्हेन्यू मार्गाकडून येणाऱ्या वाहनांमुळे रेल्वेस्थानकाजवळील जयस्तंभ चौक आणि श्रीमोहिनी ...

Y-shape flyover to be constructed near Kasturchand Park () | कस्तूरचंद पार्कजवळ साकारणार ‘वाय शेप’चा उड्डाणपूल ()

कस्तूरचंद पार्कजवळ साकारणार ‘वाय शेप’चा उड्डाणपूल ()

नागरिकांची सुविधा : वाहतुकीची कोंडी होणार दूर

नागपूर : सेंट्रल एव्हेन्यू मार्गाकडून येणाऱ्या वाहनांमुळे रेल्वेस्थानकाजवळील जयस्तंभ चौक आणि श्रीमोहिनी कॉम्प्लेक्सजवळ वाहतुकीची कोंडी होत होती. ही कोंडी दूर करण्यासाठी महामेट्रोच्या वतीने वाय आकाराचा उड्डाणपूल साकारण्यात येणार आहे.

रेल्वेस्थानक परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. सेंट्रल एव्हेन्यू मार्गाकडून रिझर्व्ह बँकेकडे आणि एलआयसी चौकाकडे दिवसाकाठी हजारो वाहने जातात. यामुळे रेल्वेस्थानकाजवळील जयस्तंभ चौक आणि श्रीमोहिनी कॉम्प्लेक्सजवळ नेहमीच वाहतूक विस्कळीत होते. त्यावर पर्याय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने कस्तूरचंद पार्कजवळ वाय आकाराचा उड्डाणपूल साकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेल्वेस्थानकाजवळील रामझुल्यापासून हा उड्डाणपूल सुरू होणार आहे. ‘डीआरएम’ कार्यालयाच्या अलीकडील भागाकडून हा उड्डाणपूल ५.५० मीटर आकाराच्या तीन लेनमध्ये सुरू होणार आहे. या दोन लेनच्या बाजूलाच २२ मीटर अंतरावर तिसरा रस्ता रेल्वेस्थानकाच्या गेटसमोर खाली उतरणार आहे. तर उर्वरित दोन लेनपैकी एक लेन रिझर्व्ह बँक चौकाकडे जाऊन सीताबर्डी किल्ल्याच्या गेटपूर्वी खाली उतरणार आहे. तर दुसरी लेन एलआयसी चौक येण्यापूर्वी नेक्सा शोरुमजवळ खाली उतरणार आहे. यामुळे जयस्तंभ चौक आणि श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स चौकातील वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे.

..........

वन वे राहील उड्डाणपूल

रामझुल्यापासून सुरू होणारा वाय आकाराच्या उड्डाणपुलाकडून सीताबर्डी किल्ला आणि एलआयसी चौकात जाता येईल. परंतु एलआयसी चौक आणि रिझर्व्ह बँक चौकाकडून या पुलाने परत सीए रोडकडे जाता येणार नाही. त्यासाठी उड्डाणपुलाच्या खालील रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.

रेल्वेस्थानकासमोर सहा लेनचा रस्ता

महामेट्रोच्या वतीने नागपूर रेल्वेस्थानकाच्या समोर सहा लेनचा रस्ता साकारण्यात येणार आहे. तसेच लोहापुलाजवळच दुसरा अंडरब्रीज साकारण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी २३४ कोटी रुपयाचा खर्च लागणार आहे.

..........

Web Title: Y-shape flyover to be constructed near Kasturchand Park ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.