शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

सोन्याचे अंडे देत आहे मध्य रेल्वेतील भंगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 11:12 AM

Nagpur News मध्य रेल्वेतील भंगार सोन्याचे अंडे देणारी कोंबडी या म्हणीला खरे ठरवित आहे. मागील वर्षात मध्य रेल्वेने आपले भंगार विकून २२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

ठळक मुद्देवर्षभरात भंगार विक्रीतून मिळविले २२५ कोटी

आनंद शर्मा

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य रेल्वेतील भंगार सोन्याचे अंडे देणारी कोंबडी या म्हणीला खरे ठरवित आहे. मागील वर्षात मध्य रेल्वेने आपले भंगार विकून २२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. मध्य रेल्वेच्या मटेरियल मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या वतीने झिरो स्क्रॅप मिशन चालविण्यात येत आहे. त्यानुसार मध्य रेल्वे झोन अंतर्गत सर्व विभाग (नागपूर, पुणे, भुसावळ, सोलापूर आणि मुंबई), वर्कशॉप आणि शेडला भंगारमुक्त करण्यात येत आहे. या मिशननुसार एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत मध्य रेल्वेने २२४.९६ कोटी रुपयांचे भंगार विकले आहे. यात भंगार झालेले रेल्वे रूळ, परमानंट वे मटेरियल, खराब झालेले कोच, वॅगन आणि रेल्वे इंजिनचा समावेश आहे. या झिरो स्क्रॅप मिशनमुळे भारतीय रेल्वेला महसूलच मिळत नसून मोठ्या प्रमाणात जागाही रिकामी होत आहे. सन २०१९-२० मध्ये मध्य रेल्वेने ५६०५७.१५ मेट्रिक टन भंगार रेल्वे रुळकोच, इंजिन विकून ३२१.४६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले होते.

झोनमध्ये झिरो स्क्रॅप मिशनची अंमलबजावणी

मध्य रेल्वेच्या मटेरियल मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या वतीने झोन अंतर्गत सर्व विभागात झिरो स्क्रॅप मिशन राबविण्यात येत आहे. त्यानुसार मागील वर्षभरात मध्य रेल्वेने भंगार विकून २२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

-शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे झोन

रेल्वेच्या भंगारावर चोरट्यांची नजर

रेल्वेच्या कोट्यवधी रुपयांच्या भंगारावर नेहमीच चोरट्यांची वक्रदृष्टी असते. पूर्व नागपुरात असे काही व्यक्ती आहेत ज्यांनी रेल्वेच्या भंगारावर आपला व्यवसाय थाटला आहे. साम, दाम, दंड, भेद हे धोरण अवलंबून या भंगार व्यावसायिकांनी कोट्यवधी रुपयांचे रेल्वेचे भंगार पळविले आहे.

पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क खरेदी

मध्य रेल्वेच्या मटेरियल मॅनेजमेंट डिपार्टमेंटने कोरोनाच्या काळात सुरू असलेल्या मालगाड्या, पार्सल गाड्यांच्या चांगल्या देखभालीच्या दृष्टीने स्पेअर पार्ट आणि इतर महत्त्वाचे साहित्य खरेदी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या विभागाने तत्परता दाखवून कमी वेळात निविदा काढून थेट प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी पीपीई किट, एन ९५ मास्क, सॅनिटायझरची खरेदी केली.

..........

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे