शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोत प्रवास करायला आवडेल :अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 01:41 IST

वेगाने पूर्ण होणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पामुळे नागपूर शहराची नवी ओळख निर्माण झाली आहे. नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कार्य पूर्ण होताच मला मेट्रोत बसायला आवडेल, अशी इच्छा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केली.

ठळक मुद्देमाहिती केंद्राला भेट, कार्याची प्रशंसा

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : वेगाने पूर्ण होणाऱ्या नागपूरमेट्रो प्रकल्पामुळे नागपूर शहराची नवी ओळख निर्माण झाली आहे. नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कार्य पूर्ण होताच मला मेट्रोत बसायला आवडेल, अशी इच्छा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केली.सध्या नागपुरात गाजत असलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यासाठी नागपुरात आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी महामेट्रो नागपूरच्या झिरो माईल येथील माहिती केंद्राला भेट दिली. शहरात मेट्रो प्रकल्पाचे कार्य सुरू असतानाच सामाजिक व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून नागरिकांना सुविधा देण्यासाठी महामेट्रो प्रशासन कटिबद्ध असल्याची बाब अभिमानाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महामेट्रो नागपूरच्या ‘धावणार माझी मेट्रो’ मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून या मोहिमेची कोल्हे यांनी प्रशंसा केली. ‘विश वॉल’वर त्यांनी महामेट्रोच्या कार्याचे अभिनंदन करून राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.याप्रसंगी महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाची माहिती दिली. माहिती केंद्रासह लावण्यात आलेले ‘सेल्फी पॉर्इंट’चे नागरिकांमध्ये आकर्षण आहे. तसेच नागपूर मेट्रो फेसबुक पेजच्या माध्यमातून नागरिक नेहमीच मेट्रोच्या संपर्कात असतात. अतिशय कमी वेळेत ४.५ लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स नागपूर मेट्रोच्या फेसबुक पेजवर आहेत. देशातील सर्व शासकीय विभागामध्ये नागपूर मेट्रोचे फेसबुक पेज प्रथम क्रमांकावर असण्याचा गौरव नागपूर मेट्रोने प्राप्त केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर