चिंताजनक! ग्रामीण भागात १९ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:08 IST2021-04-06T04:08:24+5:302021-04-06T04:08:24+5:30
हिंगणा/कळमेश्वर/सावनेर/कामठी/काटोल/कुही/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी १,१०९ रुग्णांची भर पडली तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात वाढता ...

चिंताजनक! ग्रामीण भागात १९ मृत्यू
हिंगणा/कळमेश्वर/सावनेर/कामठी/काटोल/कुही/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी १,१०९ रुग्णांची भर पडली तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात वाढता मृत्यूदर आता चिंतेचा विषय झाला आहे. रुग्ण अखेरच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
हिंगणा तालुक्यात ९८६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २१० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे ९४, डिगडोह (२६), हिंगणा (१४), गुमगाव व मेटाउमरी येथे प्रत्येकी १२ तर टाकळघाट (१०), निलडोह (८), कान्होलीबारा (७), भारकस (६), इसासनी (४), नागलवाडी (३), रायपूर (२) तर सुकळी गुपचूप, सालईदाभा, पांजरी, मोहगाव, मोंढा, गोंडवाना, शिरुळ, तुरकमारी, टाकळी संगम, किन्हीधानोली, वडधामना, मांडवघोराड, देवळी पेंढारी, जुनेवानी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. कळमेश्वर तालुक्यात १७६ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील ३५ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात १४१ रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक २९ रुग्ण धापेवाडा येथील आहेत.
काटोल तालुक्यात १५४ रुग्णांची भर पडली. यात ८१ रुग्ण शहरातील तर ७३ ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात पारडसिंगा येथे ८, येनवा (७), कलंबा व कोंढाळी येथे प्रत्येकी (५), सोनोली, लिंगा, गोन्ही येथे प्रत्येकी चार, मेटपांजरा, आजनगाव, इसापूर, मसली, मुकनी येथे प्रत्येकी तीन, हातला, चारगाव ,वाढोणा येथे प्रत्येकी दोन तर बोरी, वाघोडा, गंगाळडोह, इसापूर, कचारीसावंगा, खुटांबा, रिधोरा, कुकडी पांजरा, तपनी, खंडाळा, कलमुंडा, मसखापरा, सालई (सूतगिरणी), डोरली, मेंडकी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कुही तालुक्यात चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३६३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ६० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कुही येथे २२, मांढळ (२४), वेलतूर (१२) तर तितूर येथे दोन रुग्णांची नोंद झाली. रामटेक तालुक्यात ८० रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरातील १५ तर ग्रामीण भागातील ६५ रुग्णांचा समावेश आहे.
कामठीत ७४ रुग्ण
कामठी तालुक्यात सोमवारी ७४ रुग्णांची भर पडली. यात कामठी शहरातील २६ तर ग्रामीण भागातील ४८ रुग्णांचा समावेश आहे. यात महादुला येथे १२, खापा (११), कोराडी (७), नांदा (६), गुमथी (४), गुमथळा, लोणखैरी, पवनगाव येथे प्रत्येकी दोन तर चक्कीखापा, खसाळा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.