शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

जागतिक वडा पाव दिन; कष्टकऱ्यांपासून ते नेटकऱ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 12:16 IST

केवळ साधा बटाटेवडा व पाव असे त्याचे रुपडे आता मसाला वडा पावापासून ते चायनिज वडापावापर्यंत बदलत गेलेले आहे. २० पैसे या किंमतीपासून १०० ते दिडशे रुपयांपर्यंतची त्याची उडी गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: आज आहे २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन. कष्टकऱ्यांसाठी निर्मिलेला एक स्वस्त आणि मस्त पदार्थ.. रिक्शावाला ते कॉलेज स्टुडंट, नोकरीपेशा ते व्यावसायिक अशा सगळ्यांची भूक भागवणारा, खिशाला परवडणारा वडा पाव हा मुंबईत उदयास आला.रात्रपाळीच्या किंवा दिवसपाळीच्या गिरणी कामगारांची भूक भागवण्यासाठी दादर येथे १९६६ साली वडापावचे पहिले दुकान सुरू झाले. त्यावेळी त्याची किंमत होती अवघी २० पैसे.१९६६ साली दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली. वडापाव सुरू झाला, त्यावेळी तो २० पैशाला विकला जायचा. आज अगदी पाच रुपयांपासून मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत वडापाव मिळतो.वडापावाची राजदरबारी लागली वर्णीयांत्रिकीकरणामुळे गिरण्या बंद झाल्यावर अनेक मराठी युवक वडापावाची गाडी लावू लागले. जागोजागी या गाड्या दिसू लागल्या. त्यावेळी मुंबईत शिवसेनेने या वडापावाला राजाश्रय दिला व त्याचा पाहता पाहता विस्तार वाढला. उत्तर वा मध्यप्रदेशी समोसा आणि दाक्षिणात्य इडली डोशाला टक्कर द्यायला वडापाव सिद्ध झाला. खायला सोपा, हातात धरायला सहज आणि खिशाला परवडणारा वडापाव मग मुंबईचा राजा बनला.वडापावाची बदलती रुपेकाळानुरूप व बदलत्या पिढीनुसार वडापावाचे रंगरुपही बदलत गेले.. आज अनेक परदेशी कंपन्यांनी देशभरात वडापावचे जाळे विणलेले आहे.. कित्येक मराठी कुटुंबे वडापावाच्या भरवशावर संपन्न झाली आहेत.. केवळ साधा बटाटेवडा व पाव असे त्याचे रुपडे आता मसाला वडा पावापासून ते चायनिज वडापावापर्यंत बदलत गेलेले आहे. २० पैसे या किंमतीपासून १०० ते दिडशे रुपयांपर्यंतची त्याची उडी गेली आहे.

टॅग्स :foodअन्न