'जागतिक भाषांतर दिना'बाबत तुम्हाला माहिती आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 01:17 PM2021-09-30T13:17:35+5:302021-09-30T13:21:31+5:30

आज जागतिक भाषांतरदिन आहे, दरवर्षी जागतिक भाषांतर दिनानिमित्त एक थीम प्रसिद्ध केली जाते. यावर्षी २०२१ ची थीम “अनुवाद आणि स्वदेशी भाषा” ही आहे.

World Translation Day and its importance | 'जागतिक भाषांतर दिना'बाबत तुम्हाला माहिती आहे का?

'जागतिक भाषांतर दिना'बाबत तुम्हाला माहिती आहे का?

googlenewsNext
ठळक मुद्देजाणून घ्या काय आहे खास...

नागपूर : आज जागतिक भाषांतरदिन आहे. दरवर्षी ३० सप्टेंबरला बायबलचे अनुवादक आणि भाषांतराचे जनक, संत जेरॉम यांच्या आठवणीत दिवस हा साजरा केला जातो.

२१ वे शतक हे भाषांतराचे शतक आहे. या युगात भाषांतराविना जीवनाची कल्पनादेखील करणे अशक्य आहे. इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सच्या स्थापनेपासून म्हणजेच १९५३ मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. तर, जागतिकीकरणाच्या ह्या युगात लोकांना जागृत करण्यासाठी १९५३ मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सने जागतिक पातळीवर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

काय आहे खास 

दरवर्षी जागतिक भाषांतर दिनानिमित्त एक थीम प्रसिद्ध केली जाते. यावर्षी २०२१ ची थीम 'अनुवाद आणि स्वदेशी भाषा' ही आहे. भाषांतराबाबत आजही इंग्रजी ते फ्रेंच आणि जर्मन भाषेत भाषांतर करण्याचा व्यवसाय प्रथमस्थानी आहे. त्यानंतर जपानी, कोरियाई तसेच हिंदीसह अनेक भाषांचे आंतरराष्ट्रीय व्यवसाय भाषांतरासाठी विकसीत होत आहेत. आज जगातील जवळपास १२० भाषांमध्ये भाषांतराचे काम केले जाते. 

जागतिकीकरण, खासगीकरण यामुळे  परकीय संस्थांचा भारताकडे बाजारपेठ म्हणून पाहू लागल्या. या संस्थांना भारतात निवेश करताना येथील विविध भाषा व संस्कृतीला समजून घेणे व त्यानुसार व्यवसाय करण्यासाठी भाषांतरकारांची मोठ्या प्रमाणात गरज पडली. आणि भाषांतराचे एक मोठे क्षेत्र विकसीत झाले. आज आरोग्य, मनोरंजन, सॅफ्टवेअर, जाहिरात, आरोग्य, टेक आदि क्षेत्रांत भाषांतर करण्याचे प्रमाण वाढले आहे.

करिअरच्या संधी

आजघडीला गूगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, फ्लिपकार्ट, आलिबाबा, आयकियासह जगभरातील मोठमोठ्या कंपन्याही सर्वच देशांत आपल्या वस्तू व सेवाविक्रीसाठी भाषेची कमतरता पूर्ण करण्यासाठी व भाषांतरकारांचा वापर करते. त्यामुळेच ईकॉमर्स कंपन्यांमध्ये भाषांतराला मोठे महत्व आहे. 

या क्षेत्रातील करिअरला खूप वाव व संधी आहेत. मात्र, त्यासाठी भाषांतरकाराकडे भाषेचे उत्तम ज्ञान, परिपूर्ण माहिती, सामाजिक वचनबद्धता असणे गरजेचे आहे. त्यासोबतच व्यापक व दीर्घानुभव आणि विविध विषयांचेही ज्ञान असायला हवे. शब्दांचे योग्यरित्या  तसेच, संबंधित कंपनी वा संस्थेच्या कार्यानुसार तुम्हाला त्याचे भाषांतर करता येत असेल तर यात तुम्ही चांगल्या प्रकारे करिअर करू शकता. 
 

Web Title: World Translation Day and its importance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.