शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

देशी खिचडीचा नागपुरात ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, विष्णू मनोहर यांनी शिजवली ३००० किलोची खिचडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 11:39 AM

प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी एकाच भांड्यात तीन हजार किलो खिचडी शिजवून पाककला क्षेत्रात एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

नागपूर -भारतीय खाद्य संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी वेगवेगळ्या विक्रमाला गवसणी घालणारे नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पुन्हा एकदा नवीन विश्वविक्रम रचला आहे. नागपूरमधील महाल परिसरातील चिटणीस पार्क स्टेडियम येथे विष्णू मनोहर यांनी हा विक्रम रचला. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच राज्य सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. 

 विश्व खाद्य दिनाच्या निमित्ताने  खिचडीला ‘राष्ट्रीय अन्न’ म्हणून घोषित करावे, यासाठी वेगवेगळे जिन्नस वापरून ३००० किलोची खिचडी एकाच भांड्यात तयार केली आहे. त्यांच्या या महाकाय रेसिपीची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिमका बुक आॅफ रेकॉर्ड, एशिया बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. कारण या विश्वविक्रमी उपक्रमाला यांचे संमत्तीपत्र मिळाले आहे. सलग ५३ तास नॉनस्टॉप कुकींगचा विश्वविक्रम करणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी घराघरा आणि गरीबांच्या ताटातील खिचडीला आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिक खाद्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी रविवारी चिटणीस पार्कमध्ये ३००० किलोची खिचडी तयार केली. ही खिचडी तयार करण्यासाठी त्यांनी कोल्हापूर येथून खास कढई तयार केली.  ही खिचडी तयार करण्यासाठी त्यांनी ११ फुटाचा सराटा वापरला. लाकडाच्या इंधनाचा वापर करून स्वादिष्ट खिचडी तयार केली. विष्णूच्या या उपक्रमाला पहाटे ५.३० पासून सुरूवात झाली. विश्वविक्रम होणार असल्याने ५ परिक्षकाच्या पुढे खिचडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ५७५ किलो दाळ, ५७६ किलो तांदूळ, १०० किलो तुप, १०८ किलो मसाले, २५० किलो भाजीचा वापर करण्यात आला. सकाळी १० वाजेपर्यंत ही खिचडी तयार झाली. विष्णूने तयार केलेल्या खिचडीचा पहिला स्वाद केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी चाखला. यावेळी त्यांना दाद देण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. सोबतच मैत्री परिवाराचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, प्रा. विजय शाहाकार, प्रमोद पेंडके, निरंजन वासेकर, विजय जथे, मिलिंद देशकर, राजीव जैस्वाल यांचेही आयोजनात सहकार्य लाभले. या खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी अनाथालय, अंधविद्यालयाचे मुले उपस्थित होते.  या उपक्रमाला भेट देण्यासाठी येणाºयांनीही विश्वविक्रमी खिचडीचा आस्वाद घेतला.  

खवय्यांकडून दाद मिळत असल्यामुळे विश्वविक्रमाला गवसणी५३ तास नॉनस्टॉप कुकींग, कॉर्न फॅस्टीव्हल असो की ३००० किलोची खिचडीचा विक्रम हे केवळ दर्दी खवय्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे होत आहे. भारतात ८० टक्के लोकांच्या घरात शिजणारी आपल्या देशी खिचडीला सरकारने ‘राष्ट्रीय अन्न’ घोषित करावे एवढीच अपेक्षा आहे. -विष्णू मनोहर, प्रसिद्ध शेफ 

- विष्णूमुळे भारतीय खाद्यपदार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचत आहेपारंपारीक भारतीय पदार्थ कसे लोकप्रिय होवू शकतात, हे विष्णू मनोहर यांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यांनी खिचडी तयार करून विश्वविक्रम रचला आहे. अतिशय सुंदर खिचडी झाली आहे. भविष्यात विष्णूनी ‘विष्णू खिचडी’ हा ब्रॅण्ड तयार केल्यास चांगलाच लोकप्रिय होईल. -नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

 

टॅग्स :Vishnu Manoharविष्णु मनोहरfoodअन्नReceipeपाककृतीnagpurनागपूर