शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बनणार जागतिक दर्जाचे ' कन्व्हेन्शन सेंटर' ! सर्व परिवहन सेवांनी जुळलेली जागा निवडण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

By आनंद डेकाटे | Updated: October 10, 2025 15:37 IST

Nagpur : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत स्पेन येथील कंपनीसोबत सामंजस्य करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात सर्व सोयी सुविधांनी युक्त जागतिक दर्जाचे ' कन्व्हेन्शन सेंटर' उभारण्यात येणार आहे. याबाबत स्पेन येथील फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसोबत शुक्रवारी मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नागपूरला उभारण्यात येणारे ' कन्व्हेन्शन सेंटर' ची निवडण्यात येणारी जागा सर्व परिवहन सेवांनी उत्तमरित्या जुळलेली असण्याची सूचना केली.

यावेळी स्पेनचे भारतातील राजदूत जुआन अँटेनियो, फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरो, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, पायोनियर एक्झिबिशन अँड कॉन्व्हेन्शन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अरोरा आणि उपाध्यक्ष जीत अरोरा, नागपूचेर जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपुरात प्रस्तावित असलेले कन्व्हेन्शन सेंटर केवळ प्रदर्शने, कार्यक्रम आदींसाठी उपयोगात येणारे नसावे, तर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी हक्काचे व्यासपीठ असावे. नागपूरचा इतिहास या ' कन्व्हेन्शन सेंटर' च्या माध्यमातून येथे आलेल्या प्रत्येकाला कळावा. अशा पद्धतीने कन्व्हेन्शन सेंटरची अंतर्गत रचना असावी. हे सेंटर अत्यंत आकर्षक, आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आणि पर्यावरण पूरक वास्तूचे मूर्तिमंत उदाहरण ठरावे.

स्पेनचे राजदूत म्हणाले, भारत आणि स्पेन या दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होत आहे. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सामान्य नागरिकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. याची दखल जगाने घेतली आहे. मुंबई हे भारताचेच नव्हे, तर दक्षिण आशियाचे ' पावर हाऊस' बनत आहे. त्यामुळे मुंबई राजधानी असलेल्या महाराष्ट्रसोबत नक्कीच स्पेनला काम करायला आवडेल, अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्राचा गौरव केला.

फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरो यांनी सादरीकरण केले. यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी आणि फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसोबत सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : World-class convention center to be built in Nagpur with transport links.

Web Summary : Nagpur will get a world-class convention center. CM Fadnavis emphasized excellent transport connectivity. A MoU was signed with Fira Barcelona. The center should showcase Nagpur's history and be culturally significant, technologically advanced, and eco-friendly.
टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री