शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

World Chocolate Day : नाते डार्क चॉकलेट आणि फिटनेसचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 3:41 PM

चॉकलेट खा आणि वजन आटोक्यात ठेवा.. चॉकलेट नियमित खा आणि हृदय निरोगी राखा किंवा शरीराचे दुखणे पळवा, अशा खऱ्या अर्थाने गोड वाक्यांना जगण्याचा मंत्र दिला आहे नागपुरातील अल्ट्रा फिट जीमचे संचालक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फिटनेस एक्सपर्ट अनिरुद्ध आखरे यांनी.

ठळक मुद्देकसे निवडायचे डार्क चॉकलेट?का बरं महत्त्वाचं आहे डार्क चॉकलेट?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जास्त चॉकलेट खाऊ नको नाहीतर दात खराब होतील किंवा जास्त चॉकलेट खाशील तर वजन वाढेल अशा धमक्यांना आता विसरून जा.. चॉकलेट खा आणि वजन आटोक्यात ठेवा.. चॉकलेट नियमित खा आणि हृदय निरोगी राखा किंवा शरीराचे दुखणे पळवा, अशा खऱ्या अर्थाने गोड वाक्यांना जगण्याचा मंत्र दिला आहे नागपुरातील अल्ट्रा फिट जीमचे संचालक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फिटनेस एक्सपर्ट अनिरुद्ध आखरे यांनी.

का बरं महत्त्वाचं आहे डार्क चॉकलेट?जेव्हा तुम्हाला चॉकलेटची निवड करायची असते तेव्हा तुम्ही सामान्यपणे नॉर्मल किंवा मिल्क चॉकलेटची निवड करता. तुमचं डॉर्क चॉकलेटकडे फारसं लक्ष जात नाही. मात्र रंगाने काळसर चॉकलेटी असलेल्या या चॉकलेटमध्ये उत्तम आरोग्याची अनेक रहस्यं दडलेली आहेत असं अनिरुद्ध आखरे यांचं सांगणं आहे. त्यात कोको आणि काही महत्त्वाची तत्त्वे असतात जी काही विशिष्ट कॅन्सरच्या पेशींशी लढा देतात. कोको तुमच्यातील स्थूलपणा किंवा लठ्ठपणाशी टक्कर घेत असते. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात असलेलं झिंक आणि व्हिटॅमिन सी तुमच्या शरीरातील पेशींची झीज भरून काढण्यास मोठी मदत करत असते. तुम्हाला आठवतं का, वर्क आऊट करताना जास्त वजन उचलले किंवा अधिक वेळ जिम केले तर तुमच्या स्नायूंमध्ये एक विशिष्ट प्रकारचे दुखणे असते? लक्षात ठेवा आता की, असे दुखणे जाणवले तर एक किंवा दोन डार्क चॉकलेटचे तुकडे तोंडात टाका आणि अनुभव घ्या.कसे निवडायचे डार्क चॉकलेट?चॉकलेट खरेदी करताना त्यात किती प्रमाणात कोको आहे हे तपासा. म्हणजे ६५ टक्के कोको असलेल्या चॉकलेटपेक्षा ९० टक्के कोको असलेले चॉकलेट तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्हाला जर डार्क चॉकलेट आवडतच नसेल तर शक्यतो ड्राय फ्रूटस अधिक असलेली चॉकलेटस निवडा. चॉकलेटचे एक किंवा दोनच तुकडे खाणे हे एका वेळी योग्य असते. त्याहून अधिक ते खाऊ नये.अनिरुद्ध आखरे यांच्याविषयी थोडेसं..आयटी सेक्टरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या अनिरुद्ध आखरे यांनी फिटनेसच्या क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं. आधी दिल्ली मग कॅलिफोर्निया, सॅन डियागो, फ्रॅकफ्रूट येथे त्यांनी फिटनेस ट्रेनर म्हणून प्रशिक्षण तर घेतलंच पण तेथील जिममध्ये काम करण्याचा अनुभवही घेतला आहे. जर्मनीतील अ‍ॅथलिटस व बॉडीबिल्डर्सना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.

टॅग्स :foodअन्न