नवीन शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:38+5:302021-01-03T04:11:38+5:30
सावनेर : पंचायत समिती सावनेर आणि इग्नाईटेड माईन्ड्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सावनेर शहरातील भालेराव विद्यालयाच्या सभागृहात ‘नवीन शैक्षणिक ...

नवीन शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा
सावनेर : पंचायत समिती सावनेर आणि इग्नाईटेड माईन्ड्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सावनेर शहरातील भालेराव विद्यालयाच्या सभागृहात ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावर दाेन दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते.
उद्घाटन पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी खंडविकास अधिकारी अनिल नागणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षण अधिकारी विजय भाकरे, विजय सावजी, प्राचार्य वसंत पहाडे, इग्नाईटेड माईन्ड्सचे समनव्यक विनय पत्राळे, शशांक खांडेकर उपस्थित हाेते. विनय पत्राळे यांनी कार्यशाळेचे उद्दिष्टे व स्वरूप स्पष्ट केले. अनिल नागणे यांनी काेराेना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी या कार्यशाळेचे महत्त्व विशद केले. यावेळी अध्यपन पद्धती, भावनिक व सामाजिक बुद्धिमत्तेची ओळख, शारीरिक आरोग्य, प्राचीन भारतीय शैक्षणिक वारसा व मूल्ये, शैक्षणिक गुरू म्हणून भूमिका, संभाषण काैशल्य, नेतृत्वगुण विकास आदी विषयांवर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत ८० शिक्षक सहभागी झाले हाेते. प्रास्ताविक विजय भाकरे यांनी केले. संचालन लक्ष्मीकांत पोटोडे यांनी केले तर, उमेश धोटे यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी गट साधन केंद्र व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.