विपरीत परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्गौरव
By Admin | Updated: May 6, 2014 21:45 IST2014-05-04T23:54:11+5:302014-05-06T21:45:36+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभाग महिला कल्याण संघटनेच्यावतीने माऊंट रोडवरील रेल्वे क्लबमध्ये विपरीत परिस्थितीत काम करून रेल्वेगाड्यांचे आवागमन सुरळीत ठेवणार्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

विपरीत परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्गौरव
दपूम रेल्वेचे आयोजन : नैनपूर आणि गोंदियातही कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभाग महिला कल्याण संघटनेच्यावतीने माऊंट रोडवरील रेल्वे क्लबमध्ये विपरीत परिस्थितीत काम करून रेल्वेगाड्यांचे आवागमन सुरळीत ठेवणार्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे संघटनेच्या अध्यक्षा तनुजा कंसल होत्या. त्यांनी उपस्थित १४८ कर्मचाऱ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. कार्यक्रमात संघटनेच्या सचिव सीमा गुप्ता यांनी सक्रिय योगदान दिले. विभागात नैनपूर, गोंदिया येथेही कार्यक्रमाचे आयोजन करून नैनपूरच्या ८७ तर गोंदियाच्या १६१ कर्मचार्यांचा गौरव करण्यात आला. नैनपूर येथील कार्यक्रमाला अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. गुप्ता, गोंदिया येथील समारंभाला वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता वेदिश धुवारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)