नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:08 IST2021-07-29T04:08:05+5:302021-07-29T04:08:05+5:30
नागपूर : शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सदर येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसतिगृहात निवासव्यवस्था आहे. ...

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी
नागपूर : शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सदर येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसतिगृहात निवासव्यवस्था आहे. तरी त्यासाठी संबंधित महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन व्यवस्थापक शुभांगी मेश्राम यांनी केले आहे.
या वसतिगृहात प्रवेशासाठी संबंधित ही महिला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गाच्या वर्गवारीतील असावी. ती महाराष्ट्राची रहिवासी असावी. तसेच त्या महिलेचे नातेवाईक, आई-वडील, पत्नी महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत राहत नसावेत. अर्जदार नोकरी करणाऱ्या महिलेचे मासिक उत्पन्न तीस हजारांपेक्षा जास्त नसावे. तसेच जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत तिला या वसतिगृहात राहता येईल. त्यानंतर त्यांना निवासस्थान सोडणे अनिवार्य राहील. प्रवेश घेतेवेळी पाच हजार रुपये अनामत रक्कम वसतिगृहात जमा करावी लागेल.