शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
4
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
5
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
6
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
7
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
8
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
9
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
10
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
11
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
12
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
13
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
15
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
16
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
17
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
18
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
19
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
20
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन

एसएनडीलच्या कार्यालयाला कर्मचाऱ्यांनी ठोकले कुलूप : वीजसंकटाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 22:52 IST

वीज वितरण फ्रेंचायसी एसएनडीएलने हात वर केल्यामुळे आता महावितरणकडून कामकाज सांभाळण्याची तयारी सुरू आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देव्हेंडर काम बंद करण्याच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज वितरण फ्रेंचायसी एसएनडीएलने हात वर केल्यामुळे आता महावितरणकडून कामकाज सांभाळण्याची तयारी सुरू आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकले. शहरातील कामकाज एक तासभर बंद ठेवले. दुसरीकडे कंपनीच्या ठेकेदारांनीही गुरुवारपासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे शहराला विजेच्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एसएनडीएलने आपली ढासळती आर्थिक परिस्थिती लक्षात घेता १२ ऑगस्टला महावितरणला पत्र लिहून कामकाज सुरू ठेवण्यास असमर्थता व्यक्त केली होती. तेव्हापासून कंपनीचे व्हेंडर (ठेकेदार) आणि कर्मचारी अस्वस्थ आहेत. मागील दोन वर्षांपासून पीएलआय (इन्सेन्टिव्ह), वेतनवाढ आणि थकीत रक्कम देण्याची मागणीही कामगारांकडून होत आहे.दरम्यान, बँकांनी अकाऊंट सीज केले असून, महावितरणसोबत तोडग्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून पैसे मिळाल्यावरच कर्मचाºयांना रक्कम दिली जाईल, असे एसएनडीएल कंपनी चालविणाऱ्या एस्सेल युटीलिटीचे अध्यक्ष कमल माहेश्वरी यांनी सांगितले. यामुळे कर्मचारी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी तासभर काम बंद ठेवले. त्यानंतर सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. कंपनीचे बिझिनेस हेड सोनल खुराणा यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले. मात्र कर्मचारी काहीही एकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यांनी सोबत आणलेले कुलूप कार्यालयाला ठोकले. या घडामोडीपूर्वी कंपनीच्या व्हेंडरांनीही कार्यालयात येऊन थकीत रकमेच्या मागणीसाठी खुराणा यांना घेराव घातला होता. निघताना त्यांनी गुरुवारपासून काम बंद करण्याचा इशारा दिला.आपल्या व्यवस्थापनासह ऊर्जामंत्री आणि महावितरणच्या मुख्य अभियंत्याकडे कर्मचाऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी मागणी केली होती. मात्र कुणीच मनावर घेतले नाही. त्यामुळे आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.कॉल सेंटर बंद, काम ठप्पवीज पुरवठ्यासंदर्भातील तक्रार नोंदविण्यासाठी एसएनडीएलने सुरू केलेले कॉल सेंटर आज ठप्प होते. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यात व्यत्यय आला. ग्राहकांनी तक्रार नोंदविण्यासाठी कॉल केले, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीचे अनेक कार्यालयेही आज तासभर बंद होते. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही तक्रारी स्वीकारल्या नाहीत. ही परिस्थिती अशीच राहिली तर शहरातील वीज पुरवण्याची स्थिती गंभीर होऊ शकते.आंदोलन होणार तीव्रपंतप्रधान मोदी ७ सप्टेंबरला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दिवशी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यामुळे शहरातील वीज पुरवठा प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे. या परिस्थितीला एसएनडीएल आणि एस्सेल समूहाचे व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.घटनाक्रमावर महावितरणचे बारीक लक्षसुरू असलेल्या घडामोडीवर महावितरणचे बारीक लक्ष आहे. ७ सप्टेंबरनंतर महावितरण केव्हाही हे कामकाज हातात घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कार्यकारी अभियंत्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी घटनाक्रमाची माहिती संचालक (परिचालन) यांना दिली. शहरवासीयांना महावितरण वीज संकटात पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Employeeकर्मचारीelectricityवीजagitationआंदोलन