देशमुख-केदार यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:23 AM2019-12-31T00:23:13+5:302019-12-31T00:24:57+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच नागपुरातील त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाके फोडले. मिठाई वाटली.

Workers cheer in front of Deshmukh-Kedar's house | देशमुख-केदार यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

देशमुख-केदार यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच नागपुरातील त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाके फोडले. मिठाई वाटली.
शपथ ग्रहण होताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जीपीओ चौकात एकत्र आले. ढोल ताश्याच्या गजरात जल्लोष केला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी, अनिल देशमुख यांचे खासगी सहायक योगेश काठेकर, विक्रांत देशमुख, नूतन रेवतकर, प्रणय जांभुळकर,अनिल बोकडे, सरवर अंसारी, कमलेश बांगडे, लोकेश बोबड़े, आशिष वर्मा, शहबाज शेख, राकेश बोरीकर, संतोष सिंह, शिव भेंडे, महेंद्र भांगे, शेखर पाटील, अविनाश शेरेकर, सुरजीत सिंह, जतिन मलखान, विश्वास पखिड्डे, मनीषा साहू, अशोक अडिकने आदी उपस्थित होते. यावेळी पक्ष कार्यालयातही मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. मधुकरराव भावसार, प्यारू भाई, वसीम पटेल, अविनाश शेरेकर, अरविंद ढेंगरे, धनंजय देशमुख, प्रकाश लिखाणकर, जतीन झाडे, जतिन मालखान, रवि पराते आदी उपस्थित होते.
यावेळी सुनील केदार यांच्या लक्ष्मीनगर चौकातील घरासमोरही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सायंकाळी केदार मुंबईबून नागपूरला परत आले, तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

Web Title: Workers cheer in front of Deshmukh-Kedar's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.