डाेक्यावर दगड पडल्याने कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:27 IST2020-12-15T04:27:35+5:302020-12-15T04:27:35+5:30
काटाेल : विहिरीत काम करीत असताना निखळलेला दगड थेट कामगाराच्या डाेक्यावर पडला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू ...

डाेक्यावर दगड पडल्याने कामगाराचा मृत्यू
काटाेल : विहिरीत काम करीत असताना निखळलेला दगड थेट कामगाराच्या डाेक्यावर पडला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना काटाेल परिसरात नुकतीच घडली.
भाेजराज रमेश चाैधरी (३२, रा. बाेरी) असे मृताचे नाव आहे. ताे काटाेल परिसरात खाेदल्या जात असलेल्या विहिरीच्या कामावर हाेता. विहिरीत ब्लास्टिंग केल्यानंतर ताे दगड काढण्यासाठी खाली उतरला हाेता. काम करीत असताना कठड्याचे दगड निखळले व खाली पडले. त्यात भाेजराज व मुकुंदा डाेंगरे याच्या डाेके, पाठ व कंबरेला गंभीर दुखापत झाली. दाेघांनाही काटाेल शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे भाेजराजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी देवीदास काशीनाथ गाेहते, रा. बाेरी व अनराज ऊर्फ अण्णा सूर्यभान गायकवाड, रा. कारंजा (घाडगे), जिल्हा वर्धा या दाेघांविरुद्ध सुरक्षा साधने न पुरवल्यामुळे भादंवि ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक अश्विनी वानखेडे करीत आहेत.