शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘अजनी’तील कामाचा फटका, व्हीआयपींच्या प्रवासाचा वर्धा मार्ग ब्लॉक; रहाटे कॉलनी, वर्धा मार्ग, उड्डाणपुलावर लांबलचक रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 00:23 IST

वाहतूक पोलिसांच्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना मनस्ताप...

नागपूर : गुरुवारी सायंकाळी नागपूर शहरातील प्रमुख मार्गांवर अचानक निर्माण झालेल्या वाहतूककोंडीने नागरिकांची परीक्षा पाहिली. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर घराकडे निघालेल्या वाहनचालकांना बराच वेळ रस्त्यावर अडकून पडावे लागले. रहाटे कॉलनी, आदिवासी गोवारी शहीद उड्डाणपूल, अजनी रेल्वे स्थानक परिसर, धंतोली, चुनाभट्टी, कृपलानी चौक, दीक्षाभूमी चौक ते आयटीआय मार्ग तसेच वर्धा मार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.अजनी रेल्वे पुलाजवळ सकाळी व सायंकाळी होणाऱ्या कोंडीमुळे अगोदरच वाहनचालक हैराण झाले आहेत. त्यातच ओव्हरब्रीज चौकात ८० मीटर लांबीच्या अंडरपासचे बांधकाम सुरू झाले आहे. त्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. त्यामुळे कृपलानी चौकाकडून येणाऱ्या वाहनांना मेट्रो मार्गावरून डावे वळण घेत अजनी मेट्रो स्थानकाकडे जावे लागत आहे. मात्र, अजनी पुलावरून येणाऱ्या व धंतोलीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा फेरा मारावा लागत आहे. त्यांना कृपलानी चौकापर्यंत जावे लागत आहे. त्यामुळे कृपलानी चौकात वाहतूककोंडी झाली. अगोदरच तेथे ट्रॅव्हल्सच्या बसेस उभ्या होत्या. त्यामुळे कोंडी आणखी वाढली. त्यामुळे वर्धा मार्गावर वाहने खोळंबली. रहाटे कॉलनी चौकातदेखील वाहने थांबली व ही कोंडी उड्डाणपुलाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचली. दुसरीकडे कृपलानी चौकापासून दीक्षाभूमी चौकाजवळपर्यंत, अजनी चौकापर्यंतदेखील वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. इतकी मोठी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कृपलानी चौकात केवळ तीन ते चार पोलिस कर्मचारी होते. वाहतूक विभागाचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले.

अनेक रुग्णवाहिका अडकल्यासायंकाळी झालेल्या या वाहतूककोंडीमुळे अनेक रुग्णवाहिका, शालेय बस, खासगी कॅब्स आणि प्रवासी वाहनेही कोंडीत अडकली. अजनी रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी धावपळ करावी लागली, तर दीक्षाभूमी चौक ते आयटीआय मार्गावर वाहनांची रांग शेकडो मीटरपर्यंत पोहोचली होती.

वाहनचालकांचा संताप, अगोदर नियोजन का नाहीअनेक वाहनचालकांनी पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र ते मार्गही काही वेळातच गर्दीने भरून गेले. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर आधीच गर्दीचा अंदाज असूनही कोणतेही पूर्वनियोजन का करण्यात आले नाही, असा सवाल वाहनचालकांकडून करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajni Work Causes Traffic Chaos; VIP Route Blocked in Wardha

Web Summary : Ajni construction triggered Nagpur traffic jams, blocking Wardha road. Rahate Colony, Wardha route, and flyovers experienced long queues, impacting commuters and emergency services due to poor traffic management and lack of planning.
टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर