शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

नागपुरात  कोरोनामुळे न्यायाधीश मास्क लावून करताहेत काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 8:57 PM

कोरोनापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी न्यायाधीश मास्क लावून व अन्य आवश्यक काळजी घेऊन कामकाज करीत आहेत. वकीलही मास्क लावून युक्तिवाद करीत आहेत.

ठळक मुद्देवकीलही घेताहेत काळजी : हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा वापर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी न्यायाधीश मास्क लावून व अन्य आवश्यक काळजी घेऊन कामकाज करीत आहेत. वकीलही मास्क लावून युक्तिवाद करीत आहेत. न्यायालयात प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझर व साबणाने हात स्वच्छ केले जात आहेत.देशावरील कोरोनाचे संकट घालविण्यासाठी सर्वस्तरावर आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. न्यायालयांनीही स्वत:ला केवळ तातडीची सुनावणी आवश्यक असलेल्या प्रकरणापुरते सीमित केले आहे. अशी फार कमी प्रकरणे न्यायालयापुढे येत असली तरी सुरक्षेकरिता सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. अ‍ॅड. अनुप गिल्डा हे गुरुवारी सरकारी रुग्णालयाच्या विकासासंदर्भातील प्रकरणात युक्तिवाद करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेले होते. ते या प्रकरणात न्यायालय मित्र आहेत. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व वकील कोरोनापासून स्वत:ला वाचविण्यासाठी आवश्यक काळजी घेत असल्याचे सांगितले. हे प्रकरण ऐकण्यासाठी न्यायमूर्ती सुनील शुक्रे मास्क लावून न्यायालयात बसले होते. वकील व न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांनीही मास्क लावले होते. न्यायालयात प्रवेश करण्यापूर्वी सर्वांचा ताप तपासण्यात आला. तसेच, सॅनिटायझर व साबणाने हात स्वच्छ करायला लावले गेले, अशी माहिती अ‍ॅड. गिल्डा यांनी दिली.जिल्हा व सत्र न्यायालय आणि अन्य कनिष्ठ न्यायालयांतील न्यायाधीशही मास्क लावून प्रकरणे ऐकत आहेत. वकीलदेखील मास्क लावून व सॅनिटायझरने हात स्वच्छ करून न्यायालयात जात आहेत. जास्त गर्दी झाल्यास सर्वांना एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवायला सांगितले जाते, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी दिली. जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा यांनी संघटनेच्या वतीने न्यायाधीशांना व वकिलांना सॅनिटायझर वितरित करण्यात आल्याची माहिती दिली.अशी वेळ पहिल्यांदाच आलीन्यायालयामध्ये एवढी दक्षता घेण्याची वेळ पहिल्यांदाच आली. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी न्यायालयात खूप काळजी घेतली जात आहे. तीन-चार प्रकरणे सुनावणीसाठी असल्यास एकावेळी केवळ एकच प्रकरणातील वकिलाला न्यायालयात प्रवेश दिला जातो. तसेच, उर्वरित वकिलांमध्ये सुरक्षित अंतर ठेवले जाते. मास्क लावायला सांगितले जाते. न्यायालय परिसरात विनाकाम कुणालाही येऊ दिले जात नाही.अ‍ॅड. शशिभूषण वहाणे, हायकोर्ट.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालय