दिवसा ऊन, रात्री कडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST2021-02-05T04:52:43+5:302021-02-05T04:52:43+5:30
नागपूर : फेब्रुवारीला प्रारंभ होऊनही नागपूरसह विदर्भात ऊन आणि थंडीचा खेळ सुरू आहे. दिवसा बऱ्यापैकी ऊन आणि रात्री मात्र ...

दिवसा ऊन, रात्री कडाका
नागपूर : फेब्रुवारीला प्रारंभ होऊनही नागपूरसह विदर्भात ऊन आणि थंडीचा खेळ सुरू आहे. दिवसा बऱ्यापैकी ऊन आणि रात्री मात्र कडाक्याची थंडी असा काहीसा अनुभव सध्या येत आहे.
सोमवारी शहराचे किमान तापमान १०.४ अंश सेल्सिअस होते. सामान्यापेक्षा ४ अंशाने कमी असल्याने थंडीचा परिणाम जाणवला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसातरही थंडीचा पारा असाच राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
वातावरण कोरडे असल्याने थंडीचा परिणाम अधिक जाणवत असल्याचे हवामान खात्याचे मत आहे. यामुळे पारा खालावला असून त्याचा परिणाम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे. नागपुरात सोमवारी सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ५५ टक्के नोंदविण्यात आली. तर सायंकाळी २६ टक्के नोंदविली गेली. सोमवारीही विदर्भातून गोंदियाचे तापमान सर्वात कमी होते. ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.